6.5 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

spot_img

सरकारने सोयाबीन खरेदीची मुदतवाढ द्यावी.:- अक्षय पाटील अन्यथा तीव्र आंदोलन करू जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी….

सरकारने सोयाबीन खरेदीची मुदतवाढ द्यावी.:- अक्षय पाटील

अन्यथा तीव्र आंदोलन करू जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी….

बुलढाणा :- राज्यात नाफेड मार्फत होत असलेली सोयाबीनची खरेदी दिनांक ६ फेब्रुवारीपासून बंद पडलेली असुन शासनाने खरेदीला मुदत वाढ द्यावी या अपेक्षेने शेतकरी वाट पाहत आहेत.

एकीकडे नाफेडची खरेदी बंद तर दुसरीकडे बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली मात्र खाजगी बाजारात भाव नसल्यामुळे हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

बुलढाणा जिल्ह्यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदी सुद्धा केल्या असुन शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करून सरकारने शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा दाणांन-दाणा खरेदी करावा तोपर्यंत शासनाने खरेदी बंद करू नये.

ही मागणी घेऊन युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी आज दिनांक १२/२/२०२५ रोजी निवासी जिल्हाधिकारी बुलढाणा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व निवेदन दिले.

जर मुदत वाढ मिळाली नाही तर कोणत्याही क्षणी तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा दिला.यावेळी सोपान पाटील योगेश पाटील व आदी काही शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या