बुलढाणा ब्रेकिंग
डिपी ला लागलेली आग दोन महिलांनी विझवली…
दोन महिला बनल्या फायर फायटर…
स्वतः जीव धोक्यात घालून महिला धावल्या आग विझवायला. ..
उन्हाळा लागला की आग लागण्याच्या घटनेत वाढ होताना दिसतात .. तशी आग बुलढाणा शहरातील सम्राट अशोक नगर मधील इलेक्त्रिक डिपी ला दुपारच्या वेळेस तापमानात वाढ झाल्याने अचानक आग लागली ही बाब परिसरातील महिला श्रीमती चंद्रकला अविनाश मोरे यांच्या लक्षात आली त्यांनी सौ लता संजय जाधव यांना सांगितली तेव्हा त्या दोघी महिला ती आग विझवन्यासाठी धावल्या… चंद्रकला ताई मोरे यांनी तात्काल पाण्याचा बादल्या भरून आणून दिल्या व लता जाधव व चंद्रकला मोरे या दोघीनी ती पसरत चाललेली आग विझवण्याचा प्रयत्न केला.. मात्र ती आग वाढत चालली होती आणी ही आग इलेक्त्रिक डिपी मधून लागली होती या दोन्ही महिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ती आग विझवीत होत्या .. बाकी परिसरातील लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली… ही जर आग विझवली गेली नसती तर आगीने रुद्र रूप धारण केले असते आग परिसरात पसरली असती तर त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता बळावली होती.. मात्र चंद्रकला मोरे व लता जाधव या दोन रणरागिनींनी ही आग विझवण्याचा प्रयत्न करीत आटोक्यात आणली .. त्यांच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तसेच विज वितरण कंपनीचे जिल्हा अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी सुद्धा त्यांच्या धाडसाचे कौतुक् करून अभिनंदन केले आहे….

