2.1 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

spot_img

मलकापूरकरांचा संताप अनावर ! न प च्या आडमुठ्या धोरणाविरोधात भाई अशांत वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलनाचा इशारा!*

  • *मलकापूरकरांचा संताप अनावर ! न प च्या आडमुठ्या धोरणाविरोधात भाई अशांत वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलनाचा इशारा!*

*”सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तर परिणाम गंभीर होतील!”*
*-भाई अशांत वानखेडे*

मलकापूर:
मासिक शास्ती, मालमत्ता करआणि पाणी कर अवाजवी पद्धतीने लादणाऱ्या मलकापूर नगरपरिषदेच्या आडमुठ्या धोरणाविरोधात माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व “समतेचे निळे वादळ” संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे यांच्या नेतृत्वात एक महत्त्वपूर्ण बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, भीमनगर येथे आयोजित करण्यात आली होती.

भाई अशांत वानखेडे यांनी प्रशासनावर तीव्र हल्लाबोल करत स्पष्ट इशारा दिला की, “जर नगरपरिषदेने सामान्य नागरिकांची अडवणूक करणारी धोरणे तात्काळ थांबवली नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.”

“नागरिकांवर अवाजवी कराचा बोजा लादून नगरपरिषद स्वतःच्या अपयशाचे ओझे सामान्य माणसावर टाकत आहे,” असे भाई अशांत वानखेडे यांनी आक्रमकपणे सांगितले. त्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “शास्तीची ही रक्कम रद्द केली गेली नाही, तर मलकापूरकरांचा प्रचंड रोष तीव्र आंदोलनाच्या रूपाने उभा राहील.”

भाई अशांत वानखेडे यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या जाचक अटींवर कठोर शब्दांत टीका केली. “दारिद्र्यरेषेखालील गोरगरीब लाभार्थ्यांना घरकुलासाठीचे धनादेश न मिळणे म्हणजे गरीब जनतेवर अन्याय आहे. आधी मालमत्ता कर पाणी कर भरा मगच धनादेश देऊ अशा अटी तातडीने काढून टाका, नाहीतर तीव्र आंदोलन अटळ आहे,” असा इशारा त्यांनी दिला.

प्रशासन झोपले आहे का?
मलकापूर शहरात सर्वत्र असलेल्या कचऱ्याच्या साम्राज्यावर संताप व्यक्त करत भाई अशांत वानखेडे म्हणाले, “शहराची साफसफाई योग्य पद्धतीने होत नसेल, तर आम्ही प्रशासनाला साफ करू. नागरिकांना घाणीच्या साम्राज्यात जगायला लावणारे हे प्रशासन लाजिरवाणे आहे.”
आज रोजी मलकापूर नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने न प प्रशासन धिम्म झालेले आहे. मुख्याधिकाऱ्याशिवाय असलेले संवर्गाधिकारी आपसात बेशिस्तपणे वागत आहे त्यांच्या बेगमान वागण्याच्या पद्धतीमुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे. नको प्रशासनात कोणत्याच प्रकारची शिस्त शिल्लक उरली नाही म्हणून कायमस्वरूपी मुख्याधिकारी मलकापूर मध्ये साठी अत्यंत आवश्यक आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबीकडे तातडीने लक्ष पुरवावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

वर्षभराचा पाणीकर वसूल करणाऱ्या प्रशासनाला फटकारत, त्यांनी सांगितले, “प्रत्यक्ष पाणीपुरवठा ज्या प्रमाणात होतो, त्या प्रमाणातच कर वसुली झाली पाहिजे. 40 दिवसा साठी 365 दिवसांचा पाणीकर हे मलकापूर शहरातील नागरिकांचे प्रचंड शोषण आहे आहे !”

2021 पासून कर्मचाऱ्यांच्या पीएफ व इपीएफ कपातीचा भरणा न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर व्याजाचा बोजा वाढला आहे. वेतनातून दहा टक्के रक्कम कपात करूनही त्याचा योग्य ठिकाणी भरणा न करणे हा फौजदारी स्वरूपाचा गंभीर गुन्हा असून भाई अशांत वानखेडे यांनी याविषयी रोष व्यक्त करत सांगितले, “ही रक्कम तातडीने व्याजासह जमा झाली नाही, तर प्रशासनाला न्यायालयात खेचू !”

भाई अशांत वानखेडे यांनी मलकापूरकरांना जाहीर आवाहन केले की, “आपल्या हक्कांसाठी आवाज बुलंद करा. हे प्रशासन केवळ लुटारू धोरणे राबवते, आणि आपण ते कदापि सहन करू नये.”

भाई अशांत वानखेडे यांच्या या खणखणीत इशाऱ्यामुळे मलकापूर शहरातील नागरिकांत नवचैतन्य निर्माण झाले आहे. “आता हा लढा फक्त माझा एकट्याचा नाही, तर प्रत्येक सामान्य नागरिकाचा आहे,” असेही त्यांनी सांगितले.

नगरपरिषद प्रशासनाने या इशाऱ्याला गांभीर्याने घेतले नाही, तर मलकापूरकरांचा संताप प्रशासनासाठी धोकादायक ठरू शकतो.

यावेळी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष मा दिलीपराव देशमुख तर प्रमुख उपस्थितीत रमेशसिंह राजपूत, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उल्हास संचेती, चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष मनीष भाई लखानी, शेतकरी संघटनेचे नेते दामू शर्मा, विनोद राजदेव, सदूरामल दादाजी, रमेश पण जवानी, विजय दादा, वीरसिंह राजपूत, डॉ अशोक सुरडकर, रविचंद् टाक, डी के टाक, रंजीत धोलकर, राजेश झाजोट, मानसिंग सारसर, दत्तू टाक, गोकुल खरारे, गणेश टाक, पप्पू फुटाणे, विशाल मधुवन, बाळू पाटील, नगरसेवक रफिक आपला, राहुल देशमुख, इमरान शेख, कुणाल यवतकर आदींसह मलकापूर शहरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने हजर होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक समतेचे निळे वादळ तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी तर संचलन दिलीप भाऊ इंगळे व आभार प्रदर्शन भाई मोहन खराटे यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या