बुलढाणा
*राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागात विविध पदासाठी भरती;*
> *शिकाऊ उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन*
राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागामार्फत विविध पदाकरीता शिकाऊ उमेदवारांची पदभरती करण्यात येणार आहे. तांत्रिक, व्यावसायिक व आयटीआय उत्तीर्ण कार्यशाळा शिकाऊ उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करुन आवश्यक कागदपत्रासह 12 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन राज्य परिवहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.
> मेकॅनिक मोटार व्हेईकल(MMV) पदासांठी पात्रता – आयटीआय मेकैनिक मोटार व्यवसाय उत्तीर्ण(38 पदे). मेकॅनिक(डिझेल) पदासाठी पात्रता – आयटीआय मेकॅनिक(डिझेल) व्यवसाय उत्तीर्ण(16 पदे). मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर(MVBB) पदासाठी पात्रता – आयटीआय मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर व्यवसाय उत्तीर्ण(16 पदे). इलेक्टीशियन पदासाठी पात्रता- आयटीआय मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर व्यवसाय उत्तीर्ण(11 पदे), पेंटर पदासाठी पात्रता- आयटीआय पेंटर व्यवसाय उत्तीर्ण(4 पदे), टर्नर पदासाठी पात्रता – आयटीआय टर्नर व्यवसाय उत्तीर्ण(2 पदे), वेल्डर पदासाठी पात्रता-आयटीआय वेल्डर व्यवसाय उत्तीर्ण(6 पदे), वायरमन पदासाठी पात्रता- आयटीआय वायरमन व्यवसाय उत्तीर्ण(3 पदे), मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग पदासाठी पात्रता-आयटीआय मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग व्यवसाय उत्तीर्ण(6 पदे). सर्व पदासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष राहिल.
सन 2025-26 करीता राज्य परिवहन विभागातील विविध पदाकरीता उमेदवारांनी www.apprrenticeshipindia.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर दिलेल्या सुचनांप्रमाणे एमएसआरटीसी बुलढाणा विभाग(M.S.R.T.C. BULDANA DIVISION) या आस्थापनेकरीता ऑनलाईन अर्ज करावे. ऑनलाईन नोंदणी झालेल्या शिकाऊ उमेदवारांनी या कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज भरावे लागतील. सदर छापील अर्ज आस्थापना शाखा, राज्य परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, मलकापूर रोड, बुलडाणा येथे दि. 1 ते 12 एप्रिल 2025 पर्यंत सकाळी 10 ते 3 या वेळेत उपलब्ध असतील. तसेच लगेच अर्ज स्विकारले जातील. अर्जाची किंमत 18 टक्के जीएसटीसह खुल्या प्रवर्गातील शिकाऊ उमेदवारांसाठी 510 रुपये तर मागासवर्गीय शिकाऊ उमेदवारांसाठी 295 रुपये आहे. उमेदवारांनी राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्टद्वारे “M.S.R.T.C. FUND A/C BULDANA” या नावाने काढून अर्जासोबत सर्व कागदपत्रासह या कार्यालयास दि. 12 एप्रिल 2025 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावे. संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी झालेल्या उमेदवारांना राज्य परिवहन महामंडळ बुलडाणा विभागामध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून निवड करता येईल, याची नोंद घ्यावी.