*बुलढाणा येथे ऑसम सर्कसचे युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते उदघाट्न संपन्न…!*
तब्बल 15 वर्षानंतर बुलढाण्यात सर्कस…
आज दिनांक ३० मार्च २०२५ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर *बुलढाणा शहरामध्ये मलकापूर रोडवर गुजरात येथील श्री अजय राजगरे यांच्या ऑसम सर्कसचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारीणी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाले…!*
तब्बल 15 वर्षानंतर बुलढाणा शहरात सर्कस आली आहे, वेगवेगळ्या जीवघेण्या कसरती या सर्कस मध्ये बघायला मिळणार आहे तसेच प्राण्याना बंदी असल्याने या सर्कस मध्ये कोणतेही हिंस्त्र प्राणी नसणार .. मात्र मानवरूपी कसरती पहायला मिळणार असल्याचे कुणाल गायकवाड यांनी सांगितले आहे… शहरवासियांच्या सेवेत ओसम सर्कस दाखल झाली असून नागरिकांनी या सर्कसचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे
यावेळी सर्कसचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते…!

