बुलढाणा
इजिप्त देशातील कैरो या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय मुळव्याध परिषद आयोजित…
यशोदीप मुळव्याध हॉस्पिटल चिखलीचे संचालक डॉ.गोपाल लोखंडे यांना या परिषदे मध्ये तज्ञ व्याख्याता म्हणून विशेष निमंत्रीत
इजिप्त देशातील कैरो या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय मुळव्याध परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये चिखली शहरातील मुळव्याध तज्ञ तथा यशोदीप हॉस्पीटलचे संचालक डॉ.गोपल लोखंडे यांना तज्ञ व्याख्याता म्हणून विशेष निमंत्रीत करण्यात आले होते. या परिषदेला जगभरातून आलेल्या जवळपास 400 डॉक्टरांना त्यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे यशोदीप हॉस्पिटलच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला असून चिखली वैद्याकिय क्षेत्रासाठी देखील ही अभिमानाची बाब ठरली आहे.
इजिप्शियन सोसायटी ऑफ कोलोन अँड प्रोक्टोलॉजी वद मेडिटेरियन सोसायटी ऑफ पेल्विक फ्लोअर डिसऑर्डर यांच्या संयुक्त विद्यमानाने इजिप्त देशातील कैरो या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय मुळव्याध परिषद आयोजित करण्यात आली होती. दिनांक 10 एप्रिल ते 12 एप्रिल असे तीन दिवस ही परिषद होती. यामध्ये जगभरातील नामवंत तज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. बुलढाणा जिल्ह्यातील यशोदीप मुळव्याध हॉस्पिटल चिखलीचे संचालक डॉ.गोपाल लोखंडे यांना या परिषदे मध्ये तज्ञ व्याख्याता म्हणून विशेष निमंत्रीत करण्यात आले होते.
या परिषदेत A comparative study of radio frequency vs conventional cautery in proctology या विषयावर डॉ.गोपाल लोखंडे यांनी आपले विचार मांडले. डॉ.लोखंडे यांच्या 25 वर्षाच्या रुग्णसेवेचा अनुभव. 2001 पासून मूळव्या ध उपचारासाठी रेडिओ लहरींचा वापर तसेच या तंत्रज्ञानाने त्यांनी आतापर्यंत केलेले हजारो रुग्णांवरील यशस्वी उपचार या सर्व कार्यांची दखल घेत त्यांना या कार्यशाळेमध्ये तज्ञ व्याख्याता म्हणून बोलविण्यात आले होते. जगभरातून जवळपास 50 तज्ञ डॉक्टरांना व्याख्याता म्हणून बोलवण्यात आले होते. तसेच जगभरातील 400 डॉक्टर्स यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला.
सदर परिषदेमध्ये आपले विचार व्यक्त करत असतांनाच जगभरातील इतर तज्ञ डॉक्टरांचे विचार देखील आपल्याला आत्म सात करायची ऐकण्याची ही संधी असते. त्यातील काही गोष्टींचा आपल्या वैद्यकीय सेवेमध्ये अंतर्भाव करून रुग्णाला त्याचा अधिकाधिक फायदा होत असतो. असे विचार डॉ.गोपाल लोखंडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.