” *स्व. हेरंब देवल स्मृति शिक्षकांची हॉलीबॉल स्पर्धा*
स्व हेरंब देवल स्मृती शिक्षकांची हॉलि बॉल स्पर्धा दिनांक “27 एप्रिल ते 29एप्रिल 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे.
स्पर्धेचा मूळ उद्देश बुलढाणा मधील सर्व शाळेमधील शिक्षकांना एकत्र आणणे गेट-टुगेदर करणे हा आहे. शिक्षकांना खेळताना पाहून विद्यार्थांना सुद्धा खेळण्याची प्रेरणा मिळेल .
या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद देत बुलढाणा मधील 12 शाळांनी आपल्या शाळेतील शिक्षकांचा हॉलीबॉल संघ या स्पर्धेमध्ये उतरविला आहे .
यावर्षी या स्पर्धा सरस्वती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, बुलडाणा चे मैदानावर सायंकाळी फ्लड लाईट मध्ये खेळल्या जाणार आहेत.
या स्पर्धेला कुठलीही प्रवेश फी नाही.
स्पर्धेकरता विशिष्ट स्वरूपाचे पारितोषिक ठेवलेले आहेत ज्यामध्ये *प्रथम ,द्वितीय ,तृतीय व चतुर्थ असे चार बक्षीस (ट्रॉफी) या स्पर्धे करिता ठेवण्यात आले आहेत.
.स्पर्धा आयोजक म्हणून भारती क्रीडा मंडळ, सरस्वती क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, अष्टविनायक बहुउद्देशीय विकास मंडळ, भारत विद्यालय, बुलडाणा व श्री ओम सोलर ( सौर ऊर्जा सर्वांसाठी), शौर्य प्रतिष्ठान परिश्रम घेत आहेत. सर्वांनी ह्या चुरशीच्या लढतींचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.