बुलढाणा
*उद्या भेंडवलं येथे अक्षय तृतीयेची घटमांडणी…*
*परवा सर्वसमावेशक भाकीत वर्तविले जाईल..*
जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवलं येथे दरवर्षी परमाने याही वर्षी अक्षय तृतीयेला तालुक्यातील भेंडवड येथे घटमांडणी करण्यात येणार आहे… कृषी विषयक पिके व पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, राजकीय इत्यादी सर्वंकष वार्षिक अंदाज व्यक्त करणारी येथील वाघ परिवाराने जपलेली साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेली अक्षय तृतीयेची घट मांडणी उद्या ३० एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात येणारे असून ३१ एप्रिल रोजी सूर्योदयापूर्वी येणाऱ्या वर्षातील भाकीत वर्तवण्यात येणार आहे.
या मांडणीचे भाकिते आजपर्यंत बहुतांशी खरी ठरत असल्याने शेतकऱ्यांचा व शेतीशी निगडित असणाऱ्या व्यावसायिकांच्या दृष्टीने हा वार्षिक अंदाज जसा उत्कंठेचा विषय असतो त्याचप्रमाणे राजकीय भाकीत देखील ऐकण्यासाठी राजकीय मंडळी मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करत असतात. भेंडवड येथील वाघ कुळातील श्री चंद्रभान महाराज वाघ यांनी सुरू केलेली या मांडणीची परंपरा आज साडेतीनशे वर्षानंतरही त्यांच्या वंशजानी जिवंत ठेवली असून दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहे. यावर्षी सर्व प्रकारच्या बदलत्या वाटावरणा चा फटका कोणाला कसा बसतो या भाकिता द्वारे पुढे येणार असल्याने या कडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे

