*बुलढाणा फ्लॅश*
*आज देशभरात वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात NEET ची परीक्षा.*
*देश विदेशातील ५६६ शहरात २३,३३,२९७ नोंदणीकृत विद्यार्थी देणार परीक्षा.*
देश पातळी वरील नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे घेण्यात येणारी “वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा” अर्थात NEET होत आहे , या परीक्षेसाठी देशातील ५५२ तर इतर १२ देशात १४ अशी ५६६ शहरातील ५ हजार केंद्रावर ही परीक्षा होत आहे. दुपारी २.०० ते ५.०० यावेळेत ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार असून देशभरात प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. यावर्षी या परीक्षेसाठी २३ लाख ३३ हजार २९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.एकूण ७२० गुणांसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेनंतर वैद्यकिय प्रवेशाचा मार्ग खुला होतो त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा या परीक्षेसाठी बघायला मिळते.

