- भारत उच्च माध्यमिक विद्यालयाचा एच एस सी परीक्षेत 100 टक्के निकाल!!
बुलढाणा, (प्रतिनिधी)
भारत कनिष्ठ महाविद्यालयाने वर्ग 12 वी च्या निकालाची यशस्वी परंपरा कायम राखत यावर्षीही घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान व कला शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
यावर्षी विज्ञान शाखेतून एकूण 116 विद्यार्थ्यांपैकी प्राविण्य श्रेणीत 46 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 59 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तर कला शाखेचा निकाल हा 100 टक्के लागला असून 28 विद्यार्थ्यांपैकी 07 विद्यार्थी प्राविण्यश्रेणी, 10 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 11 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेतून हर्षल विलास पाचपांडे हा विद्यार्थी 91.67 टक्के गुण घेऊन प्रथम तर 88.3टक्के गुण घेऊन श्रीनाथ राहुल तारे द्वितीय आणि 87.50 टक्के गुण घेऊन ऋतुजा संजय किन्होळकर तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
तर कला शाखेतून 87 टक्के गुण घेऊन विशाखा रविंद्र गवई प्रथम, तर 85.83 टक्के गुण घेऊन संघमित्रा संतोष मेढे द्वितीय, तसेच 84.50 टक्के गुण घेऊन सुदेशना राधेश्याम चव्हाण तृतीय आली आहे.
सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सीमा आगाशे, उपाध्यक्ष उदय देशपांडे, सचिव अंगद आगाशे तसेच संचालक मंडळातील सदस्य, मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड, उपमुख्याध्यापक मोहन घोंगटे, पर्यवेक्षक नवल गवई व सर्व शिक्षक वृंदाने अभिनंदन केले आहे.

