-2.9 C
New York
Tuesday, December 16, 2025

Buy now

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन पदाधिकार्यांनी दिलाय आपल्या पदाचा राजिनामा…* *शरद पवार गटाला मोठा धक्का…*

बुलढाणा

*राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन पदाधिकार्यांनी दिलाय आपल्या पदाचा राजिनामा…*

*शरद पवार गटाला मोठा धक्का…*

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता सुजीत देशमुख, बुलढाणा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहाराध्यक्ष अनिल बावस्कर, शहर कार्याध्यक्ष सत्तार कुरेशी यांनी राजीनामा दिला आहे. पदासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा सुध्दा राजीनामा दिला आहे. नुकतेच सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे येणाऱ्या चार ते पाच महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडणार आहे. अशातच महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने शहरात चर्चाना उधाण आले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी या पदाधिकाऱ्यांनी महत्वाची भुमिका बजावली होती. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर यांच्या दिला आहे. आता ते कुठल्या पक्षात जातात याकडे लक्ष लागले आहे….

Related Articles

ताज्या बातम्या