16.4 C
New York
Sunday, June 15, 2025

Buy now

spot_img

बुद्धांनी जगाला विज्ञानवादी दृष्टीकोन व मानवतावादाचा संदेश दिला. प्रो. डॉ. गोपाल वछीरे

बुद्धांनी जगाला विज्ञानवादी दृष्टीकोन व मानवतावादाचा संदेश दिला.
प्रो. डॉ. गोपाल वछीरे

लोणार 12
बुद्धांनी जगाला विज्ञानवादी दृष्टिकोन देऊन मानवतावादाचा संदेश दिला असे वक्तव्य प्रो.डॉ.गोपाल बछिरे यांनी केले

बुद्ध पौर्णिमेनिमित्त लोणार येथील बुद्ध विहारात श्री तानाजी अंभोरे यांनी आयोजित कार्यक्रमात डॉ. बछिरे बोलत होते डॉ. बछिरे पुढे म्हणाले इसवी सन पूर्व सहाव्या शतकात अंधश्रद्धा कर्मकांडचे थैमान माजले होते या अंधश्रद्धेला व कर्मकांडांना कंटाळून राजपुत्र गौतम सिद्धार्थने आपले परिवार, राज्य सोडून सत्याचा शोध घेण्यासाठी बिहार प्रांतातील गया या ठिकाणी बोधी वृक्षाखाली घोर तपश्चर्या केली व त्यांना तेथेच ज्ञानाची प्राप्ती झाली व सिद्धार्थ गौतम हे बुद्ध झाले म्हणून गया या शहराला बुद्धगया व सिद्धार्थ गौतमाला बुद्ध व बुद्धांनी स्थापन केलेल्या धर्माला बौद्ध धर्म असे म्हणतात या कार्यक्रमात श्री गजानन जाधव श्री सुदन अंभोरे यांनीही आपले विचार मांडले
याप्रसंगी कैलाश अंभोरे, सिद्धार्थ अंभोरे, श्रीकांत मादनकर, तानाजी मापारी, विनायक मापारी, लूकमान कुरेशी, अमोल सुटे, भारत राठोड, मंगेश मोरे, योगेश भुक्कन, संजय नेवरे, लक्ष्मण डोंगरदिवे, दीपक अंभोरे, उमेश मोरे, कैलास मोरे, शुभम मोरे, विनोद सरदार आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी अंभोरे यांनी केले तर आभार कैलास अंभोरे यांनी मानले आणि प्रसाद म्हणून खीर वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या