स्व.नानाभाऊ पाटील बहुउद्देशीय संस्थेने बोरीअडगाव येथील निराधार कुटुंबास दत्तक घेऊन जोपासली सामाजिक बांधिलकी
.बोरी आडगाव.. स्व. नानाभाऊ पाटील बहुउद्देशीय संस्था रजिस्टर नंबर 21 234 अकोला या संस्थेने बोरी आडगाव येथील निराधार असलेल्या वच्छलाबाई करंगाळे व त्यांच्या मनोरुग्ण मुलीस दत्तक घेऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे श्रीमती वच्छलाबाई करंगाले ह्या वयोवृद्ध असून त्यांना एक मनोरुग्ण मुलगी आहे त्यांच्याकडे कोणतीही शेती नाही फक्त टीन पत्र्याचे राहण्याचे तेवढे घर आहे त्यांची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची आहे याबाबतची माहिती बोरी आडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते हिम्मत सुरवाडे व श्याम कीर्तने यांनी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.प्रतिभा टीकार.निर्मळ यांना दिली असता त्यांनी निराधार कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्यास सहकार्य करणार असून दररोज च्या गरजा भागवण्यासाठी आर्थिक मदत करून त्यांना भावनिक आधार देऊ असे एक पत्र देऊन जबाबदारी घेतल्याचे सांगितले यावेळी संस्थेच्या अध्यक्षा डॉ.प्रतिभा निर्मळ. सचिव सौ.शीतल चतरकार .शैला निर्मळ.व सामाजिक कार्यकर्ते हिम्मत सुरवाडे हे उपस्थित होते

