कुकर्मी मंत्री विजय शहाचे मंत्रीपद बरखास्त करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
डॉ. गोपाल बछिरे
लोणार प्रतिनिधी
कर्नल सोफिया कुरेशी यांचा अवमान करणारा मध्यप्रदेशचा कुकर्मी मंत्री कुवर विजय शहा यास मंत्री पदावरून बरखास्त करून त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्याकरिता निदर्शने करून निवेदन तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आले
लोणार तहसील चा परिसर मंत्री शहा यांच्या विरोधात घोषणाबाजीने परिसर दणाणला मध्यप्रदेशचा सामाजिक न्याय मंत्री कुकर्मी, नीच, कुवर विजय शहा यांनी मध्य प्रदेशातील महू येथील जाहीर सभेत भारतीय स्थल सेनेची कर्नल व सिन्दुर या ऑपरेशन ची समन्वयक कर्नल सोफिया कुरेशी या वीर कर्नलला, “पाकिस्तानच्या आतंकवाद्यांची बहीण व आतंकवाद्यांच्या बहीनिच्याच हाताने पाकिस्तानच्या आतंकवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पाठवले व तिने पाकिस्तानची आयसीच्या तैसी केली” अशा प्रकारचे अभद्र, अमानवीय, व बर्बारातापूर्ण वक्तव्य केले त्यामुळे भारतमातेची लेक थळ सेनेची कर्नल सोफिया कुरेशी केवळ ती मुस्लिम समाजाची असल्यामुळे यांच्यावर बरबरर्तापूर्ण विधान करून त्यांचा व भारतीय सैन्याचा अपमान केला.
कर्नल सोफिया कुरेशी यांच्या तीन पिढ्या भारतीय सैन्य दलात होत्या आणि त्यांनी भारतीय सैन्य दलात अनेक पराक्रम केले अशा भारतीय सैन्यदलातील कर्नल सोफिया कुरेशींना पाकिस्तानच्या मुस्लिम आतंकवाद्यांची बहीण म्हणून हिणवण्यात आले त्यामुळे भारतीय लेकीचा, आमच्या बहिणीचा व भारतीय सैन्याचा अपमान अवमान करण्यात आला आहे हे देशद्रोह आहे. त्यामुळे मध्यप्रदेशचा नीच नालायक कुकर्मी सामाजिक न्याय मंत्री कुवर विजय शहा यांना तत्काळ मंत्रीपदावरून बरखास्त करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्यास कठोर शासन करण्यात यावे यासाठी लोणार तहसीलवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निदर्शने करून तहसीलदाराच्या द्वारे राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे तालुकाप्रमुख एड. दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव सर, सुदन अंभोरे सर, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, शहर संघटक तानाजी मापारी, विभाग प्रमुख तानाजी अंभोरे, युवासेना तालुका उपप्रमुख अमोल सुटे, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, तालुका संघटक कैलास अंभोरे, फहीम खान, अश्फाक खान, ज्ञानेश्वर दूधमोगरे, नंदकिशोर पिसे, शेख अशक शेख इब्राहिम, गजानन अवसरमोल, विनायक मापारी, गोपाल मापारी, आदी मान्यवर सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

