12.6 C
New York
Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि उपोषणकर्त्यांची थट्टा यासाठी आंदोलनाची जागा प्रतिबंधित. महाराष्ट्रात एकमेव बुलढाणा जिल्ह्यातच आंदोलनाच्या जागेत बदल.. आंदोलक उपोषणकर्त्यांनी जागा बदलण्याची वारंवार विनंती केली.. सदर आदेश त्वरित रद्द करावे अन्यथा आझाद हिंद आक्रमक आंदोलन करेल.

press नोट

प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि उपोषणकर्त्यांची थट्टा यासाठी आंदोलनाची जागा प्रतिबंधित.

महाराष्ट्रात एकमेव बुलढाणा जिल्ह्यातच आंदोलनाच्या जागेत बदल..

आंदोलक उपोषणकर्त्यांनी जागा बदलण्याची वारंवार विनंती केली..

सदर आदेश त्वरित रद्द करावे अन्यथा आझाद हिंद आक्रमक आंदोलन करेल.

बुलढाणा
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आमरण उपोषणाची जागा प्रतिबंधित करण्याचा अध्यादेश रद्द करावा. त्यावर पुनर्विचार करावा. अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी दिला आहे.
या अनुषंगाने 21 मे ला
मुख्यमंत्री सचिवालय आणि जिल्हाधिकारी, कार्यालय बुलढाणा मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमरावती विभागीय आयुक्त यांना निवेदन देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह उपोषण करण्याची जागा द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण, सत्याग्रह आंदोलनाची जागा बदलण्यात यावी. यासाठी जिल्ह्यातील एकाही नागरिकांने ,संस्थेने, संघटनेने आणि पक्षाने मागणी केली नाही. असे असताना फक्त नगर परिषदेच्या विनंतीवरून सदर जागा बदलण्यात आली. महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, आंदोलन करण्याची जागा सुनिश्चित आहे.
मग एकमेव बुलढाणा जिल्ह्यातच का जागा बदलण्यात आली..? असा प्रश्न उपस्थित करत यापूर्वीही आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने आमरण उपोषण आंदोलन केले. त्यावेळी संबंधित नगरपरिषद विभागाने सदर अध्यादेशावर पुनर्विचार करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिजामाता प्रेक्षागार,आयडीबीआय बँकेसमोरील जागा सुरक्षित नाही. तसा अहवाल बुलढाणा शहरपोलीस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाला सादर केलेला आहे. तर मागील चार महिन्यात उपोषण आंदोलन करणाऱ्या महिला आंदोलकांनी संडास बाथरूम आणि सुरक्षेच्या अनुषंगाने कुचंबना होत असल्याची तक्रार केली आहे. तरीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण आंदोलनाच्या जागेवरील प्रतिबंधित आदेश रद्द करण्यात आला नाही. जिल्हा प्रशासनाचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी आणि आंदोलन उपोषणाची थट्टा करण्यासाठी सदर आदेश असल्याचा आरोप निवेदन करते आझाद हिंद चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी केला आहे.निवेदन देतेवेळी आझाद हिंद सह विविध संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
_____

Related Articles

ताज्या बातम्या