जनसामान्यांच्या तोंडाचा पाण्याचा घोट हिरावून घेनाऱ्यास सोडणार नाही….
जनसामान्यास पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्यास धडा शिकवणार….
जलजीवन मिशनमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यास त्याची जागा दाखवून देऊ…….डॉक्टर गोपाल बच्चीरे
लोणार
जनसामान्यांच्या हक्काच्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या व त्यांच्या तोंडाचा घोट हिरावून घेणाऱ्या भ्रष्टाचारी ठेकेदार व त्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यास त्यांची जागा दाखविन्या करिता शिवसेना उबाठा चे जिल्हा संघटक डॉ.गोपाल बछिरे यांनी पंचायत समिती लोणार येथे आंदोलन करून निवेदन दिले.
केंद्र सरकारने घर घर नल, नल मे जल, ही जल जीवन मिशन नावाची योजना प्रत्येक गावोगावी पूर्ण करण्यासाठी 2023 ची मुदत देण्यात आली होती आज 2025 हे वर्ष अर्ध्यावर आले परंतु ही योजना एकाही गावात पूर्णत्वास गेलेली नाही या योजनेत कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालेला आहे, एकही काम पूर्ण झालेली नाही तरीपण त्या योजनेचे 70 ते 90% बिल काढून घेण्यात आलेले आहे यामध्ये ठेकेदार तथा त्यांची पाठ राखण करणारे अधिकारी सामील आहेत जनसामान्यांच्या हक्काच्या पाण्याचा घोट या लोकांनी हिरावून घेतला आहे व जन सामान्यांना जल जीवन मिशनच्या अंतर्गत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी व त्या कामातील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी पंचायत समिती लोणार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे तालुकाप्रमुख ऍड दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी शहर संघटक तानाजी मापारी, विभाग प्रमुख अशोक सरदार, वार्ड प्रमुख अमोल पसरटे, विभाग प्रमुख रामा मोरे विभाग प्रमुख तानाजी अंभोरे अशफाक खान यांनी आंदोलन करून जल जीवन मिशनची आजपर्यंतच्या संपूर्ण कामाची माहिती द्या, जलजीवन मिशनचे काम पूर्ण का झाले नाही याचे कारण द्या, अशा प्रकारची मागणी जिल्हा परिषद पाणीपुरवठा अभियंता लोणार यांना निवेदन देऊन करण्यात आली

