15.1 C
New York
Sunday, June 15, 2025

Buy now

spot_img

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे नेतृत्वात जिल्हा पोलीस दलाची आढावा बैठक संपन्न….*

 

बुलढाणा

*पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे नेतृत्वात जिल्हा पोलीस दलाची आढावा बैठक संपन्न….*

*अवैध धंदे समुळ नष्ट करावे कोणाचीही गय होणार नाही…*

पोलीस अधीक्षक निलेश तांबे बुलढाणा यांचे नेतृत्वात पोलीस अधीक्षक कार्यालय येथे गुन्हे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला बी.बी. महामुनी अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, सुधीर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा व प्रभार मलकापूर, प्रदिप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी-मेहकर व प्रभार खामगांव, श्रीमती मनिषा कदम उपविभागीय पोलीस अधिकारी-देऊळगांव राजा यांची उपस्थिती होती.

बैटकोचे प्रारंभी नवनियुक्त पोलीस अधीक्षक मा. श्री. निलेश तांबे यांनी जिल्ह्यांची भौगोलीक स्थिती, कायदा व सुव्यवस्था संबंधीत बाबी, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण, समाज विधातक ईसमांवरील प्रतिबंधक कार्यवाही याची माहिती जाणून घेतली.

उपस्थित पोलीस अधिकारी यांना मार्गदर्शन करतांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ नष्ट करावे असे आदेशित केले व असे अवैध धंदे करणाऱ्या ईसमांचा शोध घेवून त्यांचेवर प्रचलित कायद्याखाली कठोर कार्यवाही करणेबाबत आदेशीत केले. पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जनतेशी सुसंवाद ठेवून, सौदार्यपूर्ण व सलोख्याचे ठेवणेबाबत सुचित केले. तसेच आकस्मीत प्रसंगी उद्भवलेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रसंग अत्यंत कौशल्याने व कसोशीने हाताळून सामान्य नागरीकांना नाहक त्रास होणार नाही, या दृष्टीने कार्यवाही करावी. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, समृध्दी महामार्ग, व जिल्हा मार्गावर नियमीत पेट्रोलिंग ठेवून, सणोत्सव दरम्यान बाजारपेठा, शासकिय कार्यालये, बँका, बाजारपेठा, सराफा दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर या ठिकाणी सतत पेट्रोलिंग ठेवावी. त्याच बरोबर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शासकिय कर्तव्य पार पाडतांना कोणत्याही प्रलोभन व आमिषाला बळी न पडता, कर्तव्य पार पाडावे. प्रभारी अधिकारी यांनी पो.स्टे.ला उत्कृष्ठ कामगिरीबाबत वरिष्ठांना अवगत करावे. पोलीस अंमलदारांच्या वैयक्तीक व कार्यालयीन समस्यांबाबत पाठपुरावा करावा. असे मार्गदर्शन केले. जिल्हा गुन्हे आढावा बैठकीसाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपोअ. बी.बी. महामुनी, सुधीर पाटील – उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा व प्रभार मलकापूर, प्रदिप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी-मेहकर व प्रभार खामगांव, श्रीमती मनिषा कदम- उपविभागीय पोलीस अधिकारी-देऊळगांव राजा, पोनि, अशोक लांडे स्था.गु.शा. बुलढाणा, पोनि. सुनिल अंबुलकर जिविशा, बी.डी. पावरा पो.उपअधी. (मुख्या.), सपोनि. श्रीकांत इंगोले वाचक पो.अ.बुलढाणा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व सर्व शाखांचे शाखा प्रभारी अधिकारी हजर होते.

Related Articles

ताज्या बातम्या