2.4 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत  उभारणार  दहा कोटी चे पूलआ. संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाला यश बुलडाणा, 

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत  उभारणार  दहा कोटी चे पूल … आ. संजय गायकवाड यांच्या प्रयत्नाला यश बुलडाणा, 

बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा व बुलढाणा या ठिकाणी दर्जेदार रस्ते व पुल उभारण्यात यावे, यासाठी बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड हे सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत होते. त्याच्या या प्रयत्नामुळे मतदार संघाला तब्बल १० कोटीचा निधी मंजूर झाला असून लवकरच हे  पुल उभे केले जाणार आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन अंतर्गत सदर काम केले जाणार आहे.  बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातून सदर विकास काम मार्गी लागत आहेत बुलढाणा विधानसभा मतदारसंघात बुलढाणा व मोताळा या दोन तालुक्याचा विकास व्हावा या अनुषंगाने आमदार संजय गायकवाड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.  बुलढाणा व मोताळा या ठिकाणी हे पूल उभारण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती.  यात एक पुल हे राष्ट्रीय महामार्गावरील असून एक पुल  हे स्टेट हायवे शी संबंधित आहे.  यामध्ये मोताळा येथे राष्ट्रीय महामार्ग 753 वरील खैरखेड रस्त्यावर 24 मीटर लांबीच्या  पुलासाठी दोन कोटी 91 लाख रुपयाचा निधी मंजूर  करण्यात आला आहे.  तर राज्य महामार्ग असलेल्या थड ते पोखरी रस्त्यावरील  18 मीटर च्या लांबीच्या पुलासाठी एक कोटी 45 लाख रुपये,  मोताळा येथील नॅशनल हायवे 753 ते कोली गवळी रस्त्यावरील  28 मीटरच्या पुलासाठी दोन कोटी 67 लाख रुपये,  बुलढाणा येथील प्रजिमा 24 ते जनुना जिल्हा हद्द  30 मीटर लांबी च्साया पुलासाठी तीन कोटी सहा लाख रुपये अशी एकूण दहा कोटी बारा लाख रुपये आमदार संजय गायकवाड यांच्या सातत्याने पाठपुरावाने मंजूर करण्यात आले आहे. सदर काम लवकरच प्रारंभ होणार असून बुलढाणा व मोताळा या दोन तालुक्यात दर्जेदार पूल व रस्ते सुविधा उपलब्ध होणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या