0.3 C
New York
Saturday, December 20, 2025

Buy now

spot_img

अवैध दारूबंदीसाठी शिवसेना उबाठा चा लोणार पोलीस स्टेशनवर एल्गार मोर्चा

अवैध दारूबंदीसाठी शिवसेना उबाठा चा लोणार पोलीस स्टेशनवर एल्गार मोर्चा

लोणार प्रतिनिधी
येवती येथे खुलेआम अवैध दारू विक्री होत आहे अवैध दारू विक्री बंद करावी करीता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांच्या नेतृत्वात येवतीचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थ महिलांसह एल्गार मोर्चा काढून अवैध दारू विक्री विरोधी घोषणांनी लोणार पोलीस स्टेशन परिसर दणाणून गेला.

 

लोणार तालुक्यातील येवती गाव हे सामाजिक सलोख्याचे व एकात्मतेचे एक उदाहरण आहे परंतु दोन वर्षापासून या गावात व तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट माजलेला आहे या अव्यध दारूमुळे या गावातील अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहे दारूपाई गावातील अनेक लोकांनी आपले जीव गमावले आहे, अनेक महिलांनी पुरुषांच्या दारूपायी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली आहे व पोलीस प्रशासन हे सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहे.
या गावातील व तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, तालुकाप्रमुख ॲड दीपक मापारी, शहरप्रमुख गजानन जाधव यांच्या नेतृत्वात येवती येथील शेकडो महिला व शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनवर यलगार मोर्चा काढून अवैध दारू विक्रीवर बंदीची मागणी केली मोर्चात अवैध दारू विरोधात घोषणांनी परिसर दराने गेला.
या एल्गार मोर्चा शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, तालुकाप्रमुख ॲड दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, शहरउपमुख लूकमान कुरेशी, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, शहरसंघटक तानाजी मापारी, गजानन बोरुडे, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत मादनकर, अल्पसंख्यांकविभागचे अशपाक खान, इकबाल कुरेशी, फहीम खान, विभाग प्रमुख तानाजी अंभोरे, गोपाल मापारी, युवतीच्या सरपंच प्रयागबाई पाटोळे, तंटामुक्ती अध्यक्ष गोदावरीताई कायंदे, उपसरपंच रामेश्वर कायंदे, ग्रामपंचायत सदस्य दशरथ शिंदे, ज्योतीताई सरकटे, कुसुमताई टाकसाळकर, विश्रांती ताई अडागळे, कलीम कुरेशी, मंगेश मोरे, योगेश भूक्कन शमीम शेख विजय घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक महिला उपस्थित होत्या.

Related Articles

ताज्या बातम्या