चिंचोली उपसरपंच पदी रवी सुटे
- लोणार प्रतिनिधी
लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथे उपसरपंचाच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून रवी अशोक सुटे यांची निवड.

चिंचोली सांगळे हे गाव सामाजिक सलोख्याचे व राजकीय दृष्ट्या उलथापालथ करणारे गाव आहे डिसेंबर २०२३ मध्ये या गावात ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत दशरथ कांबळे हे उपसरपंच म्हणून निवडून आले होते त्यांच्या राजीनाम्या नंतर ग्रामपंचायत सदस्य रवी अशोक सुटे यांनी उपसरपंच या पदासाठी आपले नामांकन भरले परंतु त्यांना विरोध करण्यासाठी त्यांच्या विरोधात कुणीही नामांकन दाखल केले नाही व ते बिनविरोध उपसरपंच म्हणून त्यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, तालुकाप्रमुख ॲड .दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव सर, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, शहर संघटक तानाजी मापारी, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, युवा तालुका उपप्रमुख अमोल सुटे अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख अशपाक खान, शहर प्रमुख इकबाल कुरेशी, समाधान सूटे यांनी उपसरपंच रवी सुटे यांचे बिनविरोध निवडून आल्याबद्दल सत्कार करून अभिनंदन केला

