“साक्षात विठ्ठल-रुक्मिणीच्या पायांना स्पर्श करण्यासारखी अनुभूती…!”
आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत भावनिक क्षणांपैकी एक होता…
लातूर जिल्ह्यातील हाडोळती गावातील ७६ वर्षीय वृद्ध शेतकरी अंबादास गोविंद पवार आणि त्यांच्या पत्नीला बैलजोडी नसल्याने स्वतःच्या खांद्यावर नांगर घेऊन शेती करत असल्याचं दृश्य काही दिवसांपूर्वी समोर आलं…

माझ्या डोळ्यांपुढे ती शेतजमीन, तो कोरडा नांगर आणि झिजलेले खांदे आले…
माझं शेतकरीपण जागं झालं… आणि मी ठरवलं – ही परिस्थिती बदलली पाहिजे…!

आज दिनांक ५ जुलै २०२५ रोजी मी स्वतः हाडोळती येथे जाऊन त्या वृद्ध शेतकरी दांपत्याचा पाद्यपूजन केलं… त्यांच्या पायांना जल अर्पण करून नम्र वंदन केलं. मला आज खरंच असं वाटलं – साक्षात विठ्ठल-रुक्मिणीचं पूजन करतोय…!

त्यांना मिठी मारताच ते दोघं माझ्या गळ्यात पडून रडू लागले… अश्रूंमध्ये भावना, आशीर्वाद आणि माणुसकी होती.
मी त्यांना भेट दिली —
🔸 एक चांगली बैलजोडी
🔸 ₹५०,००० ची आर्थिक मदत
🔸 वर्षभर पुरेल इतकी जीवनावश्यक किराणा सामग्री
🔸 नवीन कपड्यांचा संच
🔸 आणि शेतीसाठी आवश्यक इतर साहित्य
“साक्षात विठ्ठल-रुक्मिणीच्या पायांना स्पर्श करण्यासारखी अनुभूती…!”

आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत भावनिक क्षणांपैकी एक होता…
लातूर जिल्ह्यातील हाडोळती गावातील ७६ वर्षीय वृद्ध शेतकरी अंबादास गोविंद पवार आणि त्यांच्या पत्नीला बैलजोडी नसल्याने स्वतःच्या खांद्यावर नांगर घेऊन शेती करत असल्याचं दृश्य काही दिवसांपूर्वी समोर आलं…
माझ्या डोळ्यांपुढे ती शेतजमीन, तो कोरडा नांगर आणि झिजलेले खांदे आले…
माझं शेतकरीपण जागं झालं… आणि मी ठरवलं – ही परिस्थिती बदलली पाहिजे…!
आज दिनांक ५ जुलै २०२५ रोजी मी स्वतः हाडोळती येथे जाऊन त्या वृद्ध शेतकरी दांपत्याचा पाद्यपूजन केलं… त्यांच्या पायांना जल अर्पण करून नम्र वंदन केलं. मला आज खरंच असं वाटलं – साक्षात विन्ठ्ल-रुक्मिणीचं पूजन करतोय…!
त्यांना मिठी मारताच ते दोघं माझ्या गळ्यात पडून रडू लागले… अश्रूंमध्ये भावना, आशीर्वाद आणि माणुसकी होती.
मी त्यांना भेट दिली —
🔸 एक चांगली बैलजोडी
🔸 ₹५०,००० ची आर्थिक मदत
🔸 वर्षभर पुरेल इतकी जीवनावश्यक किराणा सामग्री
🔸 नवीन कपड्यांचा संच
🔸 आणि शेतीसाठी आवश्यक इतर साहित्य
बैलजोडीचं विधिवत पूजन केलं आणि त्या बैलांना स्वतः वखरणी करून शेतात चालवलं…
यानंतर मी त्या शेतकऱ्यांच्या घरातच त्यांच्या हातची चटणी-भाकर खाल्ली… हे फक्त अन्न नव्हतं – हे प्रेम होतं, समर्पण होतं, मातीचा गंध होता…!
उद्या ६ जुलै – आषाढी एकादशी…
या पावन दिवसाच्या पूर्वसंध्येला माझ्या मातीतल्या विठ्ठलाचा मी साक्षात्कार केला…
माझा धर्म, माझं राजकारण, माझी नाळ – ही या माणसांशी, या जमिनीशी जोडलेली आहे…!
मी आमदार म्हणून नव्हे, तर त्यांच्या मुलाप्रमाणे उभा राहिलो…
कारण शेवटी – “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले…”
बैलजोडीचं विधिवत पूजन केलं आणि त्या बैलांना स्वतः वखरणी करून शेतात चालवलं…
यानंतर मी त्या शेतकऱ्यांच्या घरातच त्यांच्या हातची चटणी-भाकर खाल्ली… हे फक्त अन्न नव्हतं – हे प्रेम होतं, समर्पण होतं, मातीचा गंध होता…!
उद्या ६ जुलै – आषाढी एकादशी…
या पावन दिवसाच्या पूर्वसंध्येला माझ्या मातीतल्या विठ्ठलाचा मी साक्षात्कार केला…
माझा धर्म, माझं राजकारण, माझी नाळ – ही या माणसांशी, या जमिनीशी जोडलेली आहे…!
मी आमदार म्हणून नव्हे, तर त्यांच्या मुलाप्रमाणे उभा राहिलो…
कारण शेवटी – “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले