-1.6 C
New York
Monday, December 15, 2025

Buy now

spot_img

प्रलंबित देयकांसाठी जलजीवन मिशन चे काम करणारे कंत्राटदार एकवटले ..* *केलेल्या कामाचा निधी मिळत नसल्याने उर्वरित कामासाठी मुदतवाढ देण्याची मागणी. .*

बुलढाणा …

*प्रलंबित देयकांसाठी जलजीवन मिशन चे काम करणारे कंत्राटदार एकवटले ..*

*केलेल्या कामाचा निधी मिळत नसल्याने उर्वरित कामासाठी मुदतवाढ देण्याची मागणी. .*

*शोकसभेत सांगली येथील आत्महत्या केलेल्या कंत्राटदार हर्षल पाटील ल वाहिली श्रद्धांजली ..*

*शासनाचा केला निषेध. .*

सांगली जिल्ह्यातील जलजीवन मिशनचे कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येने राज्यभर खळबळ उडाली असून, बुलढाणा येथे जिल्हा परिषद प्रांगणात हर्षल पाटील यांना महाराष्ट्र पाणी पुरवठा कंत्राटदार संघटना कडून श्रध्दांजली अर्पण करून शासनाचा निषेध करण्यात आला.. यावेळी कंत्राटदार संघटनेने त्यांच्या प्रलंबित देयकांसाठी शासनाकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेमार्फत त्यांच्या मागण्याचे निवेदन ही दिल. . यामध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या समस्या शासन दरबारी नेण्यात याव्यात, यात गेल्या आठ महिन्यांपासून निधी उपलब्ध अभावी अनेक योजना बंद पडण्याचा मार्गावर आहेत..

निधी उपलब्ध होईपर्यंत कंत्राटदारांनी रोखीने भरलेली व बिलातून कपात केलेली सुरक्षा ठेव त्यांना तात्पुरत्या स्वरुपात परत मिळावी, जल जीवन मिशनअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या कंत्राटदारांनी दाखल केलेल्या देयकातन १० टक्के लोकवर्गणी कपात केली जात आहे, ही कपात अन्यायकारक असून त्या संदर्भात विचार केला जावा, नळ पाणी पुरवठा राबवत असताना काही स्थानिक अडचणी, विहिर व पाण्याची टाकी जागा उपलब्धता, महावितरण यांचेकडून वीज जोडणे या कामात होणारी दिरंगाई तसेच वन विभाग, रेल्वे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे नारहकत या कारणामुळे योजना पूर्ण करण्यास विलंब होत आहे.. अशा योजनांचा सरसकट विनादंड २०२८ पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. यासह विविध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या ..

Related Articles

ताज्या बातम्या