बुलढाणा
*भर पावसाळ्यात पाणी टंचाई, महिलाची पाण्यासाठी भटकंती…*
*पाणी पट्टी भरूनही सरपंच व ग्रामसेवक यांचा हेकेकोरपणा. .*
*धरण उशाशी नंतर ग्रामस्थ उपाशी …6 महिन्यापासून पाण्याविना..*

गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे, चिखली तालुक्यातील काही धरबे गाव तलाव जेमतेम भरले आहेत , पेन टाकळी ओहरफ्लो झाले आहे अश्या अवस्थेत तालुक्यातील सावरखेड हे गाव पेनटाकळी धरण नजिक आहे मात्र गेल्या 6 महिन्यापासून मानवी संकटामुळे गावाला पाणी पुरवठा केल्या जात नसल्याने ग्रामस्थांना भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लगत असल्याचे चित्र समोर आले आहे… पाणी पट्टी कर भरला असून घर पट्टी कर काही जणांचे राहिले असल्या कारणाने सरपंच व ग्रामसेवकाने पाणी पुरवठा बंद केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.. अश्या मुजोर ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करताना दिसत आहे.. 1000 लोकवस्ती असलेल्या सावरखेड गावात नादुरस्त हातपंप आहे त्याला पाणी नाही, त्यामुळे कुठेतरी दूरवरील विहिरीचे पाणी आणण्यासाठी महिलांना भटकंती करावी लगत आहे.. तातडीने जिल्हा प्रशासनाने लक्ष देत ग्रामस्थांना पाणी पुरवठा करावा अशी मागणी सावरखेड येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे..

