-1.9 C
New York
Saturday, December 13, 2025

Buy now

spot_img

*उ.बा.ठा गटाचे श्री.आशिष बाबा खरात यांचा आपल्या शेकडो सहकार्यांसमवेत शिवसेना पक्षात भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न…!*

🚩 *भव्य पक्षप्रवेश सोहळा तथा घरवापसी* 🚩

*उ.बा.ठा गटाचे श्री.आशिष बाबा खरात यांचा आपल्या शेकडो सहकार्यांसमवेत शिवसेना पक्षात भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न…!*

 

आज दिनांक १३ ऑगस्ट २०२५ रोजी *बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या विकसनशील नेतृत्वावर विश्वास ठेवून सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच उबाठा गटाचे नेते श्री आशिष बाबा खरात यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसमवेत शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला….!*

यावेळी त्या ठिकाणी आशिष खरात यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना सांगितले की, हा माझा पक्षप्रवेश नसून माझी घरवापसी आहे, धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचे समाजासाठी असलेले कार्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत नेण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्यासोबत काम करत राहील असे सांगितले….!

 


यावेळी त्या ठिकाणी मंगेश सुरडकर, संदीप धुरंदर, बाळा राऊत,रामदास दाभाडे,सुदर्शन खराटे, अजय आराख, शंकर खिल्लारे,किशोर सुरडकर,राजु राजपूत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षांमध्ये प्रवेश केला..!

यावेळी त्या ठिकाणी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना नेते विजय अंभोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील,धर्मवीर युथ फाउंडेशन अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, शिवसेना महिला आघाडी नेत्या अनुजाताई सावळे, जिजाताई राठोड, शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, शिवसेना महिला आघाडी संघटक वैशालीताई ठाकरे, माजी नगरसेवक प्रमिलाताई गवई, तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, माजी आरोग्य सभापती नगरपालिका आशिष जाधव, शाम पवार, उदय सुरडकर, रामेश्वरी ताई चव्हाण, जीवन उबरहंडे, स्वीय सहाय्यक श्रीकृष्णा शिंदे,ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी शिवसैनिक माता भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….!

Related Articles

ताज्या बातम्या