*बुलढाणा फ्लॅश*
*महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चुन पोलिसांची वाळू माफियांवर धडक कारवाई.*म….
*खडकपूर्णा धरण क्षेत्रात स्थानिक गुन्हे शाखेने वाळू व माफियांवर केली मोठी कारवाई.*…….
*वाळू उपसा करणाऱ्या सात बोटींसह 90 लाखांचा मुद्देमाल जप्त.*
खडकपूर्णा धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळूचा उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या. याची दखल पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घेत कालपासून खडकपूर्णा धरण क्षेत्रातील अवैध वाळू माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने कारवाई केली आहे. अलीकडच्या काळात ही सर्वात मोठी कारवाई असून जवळपास सात वाळू उपसा करणाऱ्या बोटीनसह 90 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खरं तर ही कारवाई महसूल प्रशासनाने करणे अपेक्षित असताना पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ही कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

