*सेवाभावी प्राचार्य वसंतराव गाडेकर यांचे कुटूंब राज्यस्तरीय कृती गौरव पुरस्काराने सन्मानित*
चिखली – सामाजिक , शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात निरंतर सहभागी होऊन समाजहितासाठी प्रामाणिकपणे काम करणारे चिखली येथिल प्राचार्य वसंतराव गाडेकर गुरुजी व त्यांचे संपूर्ण कुटूंबातील सदस्य उत्कृष्ट गायिका कु. संपदा गाडेकर , तबला वादक चि . ऋतुराज वसंत गाडेकर , हार्मोनियम वादक मुलगी सौ . स्नेहल सतिश सोळंकी व पत्नी सौ . मिनाताई गाडेकर यांना विशेष निमंत्रित करून शेगांव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात कृती गौरव पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .
याबाबत सविस्तर असे की , अमरावती येथिल बी . एस . एफ . बहुउद्देशिय सेवाभावी संस्था अमरावती तसेच संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलडाणा व संकल्प बहुउद्देशिय संस्था अकोला आणि उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रहिताच्या दृष्टीने सामाजिक, शैक्षणिक ,साहित्यिक ,धार्मिक , काव्य, कृषी, पत्रकारिता, योग कला या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याच्या दृष्टीने कृती गौरव राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे भव्य -दिव्य आयोजन महाराणा प्रताप शिक्षण संस्थेचे संस्थापक इंजिनियर तथा संत मुक्ताई मीराई फिल्म इन्स्टिट्युटचे निर्माता दिग्दर्शक लेखक अभिनेता व अभाम चित्रपट निर्माता महामंडळ मुंबई उपाध्यक्ष डी .एन . इंगळे साहेब यांच्या विशेष उपस्थितीत व नाशिक येथिल आपुलकी सोशल वेलफेअर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अंबादास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य आयोजक भूषण सरदार यांचेकडून शेगांव येथिल साई गजानन मंगल कार्यालयात करण्यात आले होते .
सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी वरीष्ठ कोषागार अधिकारी सौ शिल्पा पवार , समाजसेवक तथा वृक्षसंरक्षक डॉ रावसाहेब घोडेराव , दिग्दर्शक व लेखक अल्ताफ दा . शेख, संत कबीर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र हेलोडे , प्रसिद्ध साहित्यीक अश्विनी कांबळे , डॉक्टर गणेश व्यवहारे , नाशिक येथिल समाजसेविका वैशाली सोनवणे , अतिरिक्त स्वीय सहाय्यक मंत्रालय मुंबई येथिल भगवान पवार , अभिनेता सुरज मानकर , प्रसिद्ध मॉडेल ऋतुजा लुटडे , प्रसिद्ध लेखक सतिश शिंदे , प्रसिद्ध रिल्स स्टार संध्या पहुरकर तसेच प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस विजयसिंग इंगळे , रामदास मोरे , संजय जाधव , उद्धवराव ठेंग , सतिश सोळंकी यांचेसह राज्यभरातील शेकडो कर्तबगार नामवंत व्यक्ती उपस्थित होते .



