बुलढाणा ब्रेकिंग
*ग्रामीण जनतेचा आधारवड – लोकायात फाउंडेशनचे समाजकार्य ठरत आहे आदर्शवत….*
बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील गोरगरीब, गरजू, पीडित घटकांसाठी आशेचा किरण ठरत असलेले लोकायात फाउंडेशन आज जिल्ह्यातील एक अग्रगण्य सामाजिक व्यासपीठ बनले आहे. समाजाच्या तळागाळातील लोकांच्या अडीअडचणींमध्ये धावून जाणारे लोकायात फाउंडेशन हे आज हजारो कुटुंबांचे आधारस्थान ठरत आहे.
लोकायात फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण, आपत्तीग्रस्त मदत, शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे अशा विविध क्षेत्रात सातत्याने कार्य केले जात आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबांना उपचारासाठी आर्थिक मदत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, विधवा व निराधार महिलांना आधार, तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात तातडीने मदत पोहोचवण्याचे काम फाउंडेशन करत आहे.
या फाउंडेशनशी आज जिल्हाभरातून हजारो स्वयंसेवक, कार्यकर्ते आणि सामाजिक बांधिलकी असलेले नागरिक जोडले गेले आहेत. प्रत्येक तालुक्यात लोकायात फाउंडेशनचे कार्यकर्ते गरजूंना शोधून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवतात. त्यामुळे “मदतीसाठी दारोदार फिरण्याऐवजी लोकायातच मदतीसाठी दारात येते” अशी भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे.
लोकायात फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर गवई हे गेल्या अनेक वर्षांपासून कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजासाठी अविरत झटत आहेत. स्वतः वेळ देऊन गरजूंच्या समस्या ऐकून घेणे, प्रशासनाशी पाठपुरावा करणे आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचवणे हेच त्यांचे ध्येय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली लोकायात फाउंडेशन आज केवळ संस्था न राहता एक सामाजिक चळवळ बनली आहे.
ग्रामीण भागातील गरजूंसाठी लोकायात फाउंडेशन हे देवदूतासारखे ठरत असून, समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे महत्त्वाचे कार्य ते करीत आहेत. त्यामुळेच लोकायात फाउंडेशन हे आज जिल्ह्यातील एक विश्वासार्ह, लोकाभिमुख आणि प्रेरणादायी सामाजिक संघटन म्हणून ओळखले जात आहे.



