3 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

नवीन वर्षाचे स्वागत आनंदात करा; मात्र मद्यपान करून वाहन चालवल्यास थेट कारवाई — एसपी निलेश तांबे यांचा सज्जड इशारा…*

बुलढाणा

*नवीन वर्षाचे स्वागत आनंदात करा; मात्र मद्यपान करून वाहन चालवल्यास थेट कारवाई — एसपी निलेश तांबे यांचा सज्जड इशारा…*

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक मोठ्या उत्साहात तयारी करत असतानाच, सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने बुलढाणा जिल्हा पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिला आहे.
नववर्षाच्या रात्री शहर व ग्रामीण भागातील मुख्य रस्ते, महामार्ग, चौक, हॉटेल परिसर, फार्महाऊस, रिसॉर्ट्स, पार्टी स्थळे येथे पोलिसांचे विशेष नाकाबंदी पथक तैनात असणार आहे. प्रत्येक वाहन चालकाची तपासणी करण्यात येणार असून ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या माध्यमातून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची ओळख पटवली जाईल.
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे हे केवळ स्वतःच्या जीवाला नाही तर इतरांच्या जीवालाही धोका निर्माण करणारे कृत्य आहे. त्यामुळे अशा प्रकाराला कोणतीही माफी दिली जाणार नाही. दोषी आढळणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड, परवाना निलंबन, गुन्हा दाखल करणे तसेच वाहन जप्तीपर्यंत कारवाई करण्यात येईल, असेही एसपी तांबे यांनी स्पष्ट केले.
तसेच नागरिकांनी नववर्षाचे स्वागत आनंदात, पण जबाबदारीने करावे, मद्यपान केल्यास स्वतः वाहन चालवू नये, टॅक्सी, मित्र किंवा पर्यायी वाहनांचा वापर करावा आणि कायद्याचे पालन करावे, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असून नववर्षाची सुरुवात कुणासाठीही दु:खद ठरू नये, हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या