5.1 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

बुलढाण्यातील म्हाडा कॉलनीत बिबट्याचा वावर; रात्री कुत्र्याची शिकार — नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…*

बुलढाणा

*बुलढाण्यातील म्हाडा कॉलनीत बिबट्याचा वावर; रात्री कुत्र्याची शिकार — नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…*

बुलढाणा शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आढळून येत असून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका कुत्र्याची बिबट्याने शिकार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
म्हाडा कॉलनी ही दाट लोकवस्ती असलेली वसाहत असून येथे लहान मुले, वृद्ध नागरिक आणि महिला मोठ्या प्रमाणावर आहेत. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे धोकादायक ठरत असून नागरिकांनी भीतीपोटी रात्रीची हालचाल कमी केली आहे.
घटनेनंतर सकाळी परिसरात कुत्र्याचे अवशेष आढळून आले. नागरिकांनी तत्काळ ही बाब वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
“जर आज कुत्र्याची शिकार झाली, तर उद्या माणसांवर हल्ला होणार नाही ना?” अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे वन विभागाने तत्काळ पिंजरा लावावा, परिसरात गस्त वाढवावी आणि नागरिकांना योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
दरम्यान, नागरिकांना रात्री बाहेर पडू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित वन विभाग किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.
या घटनेमुळे बुलढाणा शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून वन विभाग यावर काय उपाययोजना करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या