273 प्राथमिक शिक्षकांची दोन कोटी 18 लाख 88 हजाराची वैद्यकीय देयके मंजूर…
बुलढाणा..
गेल्या वर्षभरापासून प्राथमिक शिक्षकांची प्रलंबित वेतन देयके मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी बुलढाणा जिल्ह्यातील 273 प्राथमिक शिक्षकांची वेतन देयके मंजूर करण्यात आली असून दोन कोटी 18 लाख 88 हजार 547 रुपयाची वित्त प्रेषण संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे येत्या 4/5 दिवसात पाठवण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली.
गेल्या वर्षभरापासून प्राथमिक शिक्षकांची वेतन देयके प्रलंबित होती याबाबत विविध शिक्षक संघटना , मान.लोकप्रतिनिधी वारंवार याबाबतीत पाठपुरावा करत होते या पाठपुराव्या नुसार शिक्षक संघटनांच्या सहविचार सभेत शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सदर वेतन देयके महिन्याभराच्या आत मान्य केली जातील अशा प्रकारची ग्वाही दिली होती. त्यानुसार आज दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी या शिक्षकांची तसेच जिल्हा परिषद हायस्कूल मधील पंचवीस शिक्षकांची 142316 रुपयाची वेतन देयके कोषागार कार्यालयात पाठवण्यात आलेली असून येत्या आठवड्याभरात सदर निधी संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकारी यांच्या स्तरावर पाठवण्यात येणार आहे.
या कामकाजात मुख्य लेखा वित्त अधिकारी श्री राठोड साहेब व त्यांच्या कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे तसेच शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे तसेच सामान्य प्रशासन विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष पवार व त्यांच्या कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन व योगदान लाभले.
मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागातील सर्वच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा सपाटा प्राथमिक शिक्षण विभागाने लावला असून शिक्षकांनी फक्त गुणवत्ता वाढीकडे व प्राथमिक शिक्षणाच्या निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाकडे आवर्जून लक्ष द्यावे . शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून त्यानुसार कार्यवाही सुरू आहे शिक्षकांनी फक्त बुलढाणा जिल्हा निपुण होण्यासाठी आपले सर्वतोपरी 100% योगदान द्यावे असे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील यांनी केले आहे.



