3 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

स्वीकृत नगरसेवकांसाठी  आ संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका गटनेता श्री.मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात नामांकन अर्ज सादर….!

स्वीकृत नगरसेवकांसाठी  आ संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका गटनेता श्री.मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात नामांकन अर्ज सादर….!

जिल्हा नगरविकास सहआयुक्तांकडे बुलढाणा नगरपरिषदेच्या तीन जागांसाठी प्रस्ताव दाखल..!

बुलढाणा नगरपरिषदेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी आवश्यक असलेले आवेदन अर्ज नगरविकास विभागाचे जिल्हा सहआयुक्त, बुलढाणा यांच्याकडे अधिकृतरीत्या सादर करण्यात आले. हे अर्ज बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आ तथा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख  संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बुलढाणा नगरपालिकेचे गटनेते, युवानेते. मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दाखल करण्यात आले.
बुलढाणा नगरपरिषदेतील तीन स्वीकृत नगरसेवकांच्या जागांसाठी शिवसेनेच्या वतीने हे अर्ज सादर करण्यात आले असून, यामुळे नगरपरिषदेतील लोकाभिमुख विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी नगरसेवक  गजेंद्र दांदडे, सचिन गायकवाड, बबलू ऊर्फ अमित मावतवाल, योगेश परसे, देवेन खोत, सागर घट्टे, विजयसिंग राजपूत, सुनील सपकाळ, उदय देशपांडे, मोहन पऱ्हाड,  अरविंद होंडे,  मंगेश बिडवे,  सचिन हिरोळे, ज्ञानेश्वर वाघ,  ज्ञानेश्वर खांडवे,  वरुण कुळकर्णी, सचिन कोठाळे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, विद्यमान व माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना गटनेते युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी सांगितले की, “स्वीकृत नगरसेवकांच्या माध्यमातून नगरपरिषदेतील विकासकामांना अधिक सक्षम बळ मिळणार असून, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय देता येईल.” आ संजय् गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या अर्ज सादरीकरणामुळे बुलढाणा नगरपरिषदेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी काळात शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे…..!

Related Articles

ताज्या बातम्या