2.2 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

महाराष्ट्र हादरला! विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन*

💥 बिग ब्रेकिंग* 💥
*महाराष्ट्र हादरला! विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन*

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती येथे विमान अपघातात दुःखद निधन झाले. या भीषण अपघातात विमानातील अन्य ५ जणांचाही मृत्यू झाला असून, संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी साधारण ८:४५ ते ९:०० च्या सुमारास त्यांचे चार्टर्ड विमान बारामती विमानतळावर लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडला. तांत्रिक बिघाडामुळे लँडिंगच्या वेळी वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीजवळ कोसळले.
कोसळल्यानंतर विमानाने भीषण पेट घेतला. काही क्षणांतच संपूर्ण विमान जळून खाक झाले.
या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे वैमानिक, स्वीय सहाय्यक आणि सुरक्षारक्षक अशा एकूण ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.
अजितदादांच्या निधनाची बातमी समजताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि विविध राजकीय नेत्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या चुलत भगिनी खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीहून तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या आहेत.
अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा एक ‘पॉवर हाऊस’ हरपला आहे. ही राज्याची कधीही न भरून येणारी हानी आहे.
नागरी विमान वाहतूक संचालनालयाने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्या घटनास्थळी बचाव पथक आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात असून परिसर सील करण्यात आला आहे.
आमच्या दैनिक बातमीजगत परिवाराच्या वतिने महाराष्ट्राच्या लाडक्या ‘दादां’ना भावपूर्ण श्रद्धांजली!

Related Articles

ताज्या बातम्या