2.2 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

मोताळ्यात काँग्रेसला मोठं खिंडार;… आ. संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश…*

बुलढाणा

*मोताळ्यात काँग्रेसला मोठं खिंडार;… आ. संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश…*

मोताळा तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे. बुलढाणा शहरातील शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला…आमदार संजय गायकवाड यांच्या विकासात्मक, लोकाभिमुख आणि कर्तव्यदक्ष नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत मोताळा तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. या पक्षप्रवेशामुळे मोताळा तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे…या जाहीर पक्षप्रवेशामध्ये शाहरुख बाबा, तनवीर बाबा, सोफियान बाबा, फैजान बाबा, मोशीन बाबा, शहेबाज बाबा, सोहिल बाबा, रेहान बाबा, नय्युम बाबा, फयुम बाबा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश केवळ राजकीय निर्णय नसून जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणाऱ्या नेतृत्वावर व्यक्त झालेला ठाम विश्वास असल्याची भावना आमदार संजय गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली….आ. संजय गायकवाड यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिवसेना परिवारात मनःपूर्वक स्वागत करताना सांगितले की, शिवसेना हा सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारा पक्ष असून विकास, सेवा आणि जनतेशी थेट नाळ जोडून काम करणारी संघटना आहे. नव्या सहकाऱ्यांच्या सहभागामुळे मोताळा तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होणार असून आगामी काळात परिवर्तनाची दिशा अधिक ठळक होईल….या पक्षप्रवेश सोहळ्याला उपनगराध्यक्ष गजेंद्र दांदडे, मोईन काझी, सुनील उदयकार, उपशहरप्रमुख विजय कोल्हे, नगरसेवक उदयदादा देशपांडे, गोविंदा खुमकर, शेख बाबा, शेख जावेद, अशरफ भैया, प्रकाश पांडे, सचिन हिरोळे, रणजीत राजपूत यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…हा जाहीर पक्षप्रवेश शिवसेनेच्या कार्याला नवे बळ देणारा ठरत असून मोताळा तालुक्यात शिवसेनेचा जनाधार अधिक भक्कम होण्याचे संकेत देणारा मानला जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या