2.2 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

बुलढाणा जिल्हा ‘कॉपीमुक्त’ करण्यासाठी प्रशासन सज्ज;….. १० वी आणि १२ वीच्या परीक्षांसाठी कडक निर्बंध

  1. बुलढाणा जिल्हा ‘कॉपीमुक्त’ करण्यासाठी प्रशासन सज्ज;…..
    १० वी आणि १२ वीच्या परीक्षांसाठी कडक निर्बंध

बुलढाणा, दिनांक ०३(जिमाका): राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा जिल्ह्यात पारदर्शक, भयमुक्त आणि ‘कॉपीमुक्त’ वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समितीने या संदर्भात कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून, परीक्षा केंद्रांवर कडक देखरेख ठेवण्यात येणार आहे.यंदाच्या परीक्षेत जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्याचे नियोजन खालीलप्रमाणे आहे:
* इयत्ता १२ वी: १० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ (विद्यार्थी: ३५,२११ | केंद्र: ११७)
* इयत्ता १० वी: २० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ (विद्यार्थी: ४०,८२८ | केंद्र: १६१)

परीक्षा केंद्रांवर ‘कलम १४४’ लागू:परीक्षेच्या कालावधीत गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांच्या ५० मीटर परिसरात कलम १४४ (जमावबंदी) लागू करण्यात आली आहे. तसेच, केंद्राच्या परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, कॉम्प्युटर सेंटर्स आणि मोबाईल सेंटर्स परीक्षा सुरू होण्यापूर्वी २ तास आधीपासून परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्रिस्तरीय सुरक्षा आणि देखरेख व्यवस्था: प्रशासनाने परीक्षेच्या गोपनीयतेसाठी आणि शिस्तीसाठी व्यापक यंत्रणा तैनात केली आहे: * ०८ भरारी पथके: जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही पथके कार्यरत राहतील. * सी.सी.टी.व्ही. पाळत: जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर आणि १६ परिरक्षक केंद्रांवर सी.सी.टी.व्ही. यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. * बैठे पथक: प्रत्येक केंद्रावर महसूल विभागाचे ‘बैठे पथक’ तैनात असेल, जे पेपर सुरू होण्यापूर्वी १ तास धी केंद्रावर उपस्थित राहील.वाहतुकीसाठी कडक नियम:पेपरची गोपनीयता राखण्यासाठी परिरक्षक केंद्रावरून प्रश्नपत्रिका नेण्यासाठी आणि उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी केवळ चारचाकी वाहनांचाच वापर अनिवार्य करण्यात आला आहे. कोणत्याही शिक्षकाला किंवा रनरला मोटारसायकल वापरण्यास सक्त मनाई आहे.जिल्हा प्रशासनाचे आवाहन:

“कॉपीसारख्या गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. भावी पिढी सक्षम घडवण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याला तणावमुक्त वातावरणात परीक्षेसाठी प्रोत्साहित करावे. तसेच, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही परीक्षा प्रक्रिया पूर्णतः पारदर्शकपणे पार पाडावी,” असे आवाहन जिल्हाधिकारी व दक्षता समितीने केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या