3 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

अजितदादा गेले तरी सिंचन घोटाळ्यांची न्यायालयीन प्रक्रिया थांबणार नाही” – चितळे समितीचा अहवाल दाबल्याचा आरोप; विजय पांढरेंचे धक्कादायक खुलासे..*

बुलढाणा ब्रेकिंग

*“अजितदादा गेले तरी सिंचन घोटाळ्यांची न्यायालयीन प्रक्रिया थांबणार नाही” – चितळे समितीचा अहवाल दाबल्याचा आरोप; विजय पांढरेंचे धक्कादायक खुलासे..*

सिंचन घोटाळा प्रकरणात तत्कालीन अधीक्षक अभियंता विजय पांढरे यांनी अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत….
“अजितदादांचा अपघाती मृत्यू दुर्दैवी आहे, त्याची चौकशी होईलच. मात्र सिंचन घोटाळ्यांतील न्यायालयीन प्रक्रिया त्यांच्या मृत्यूनंतरही सुरूच राहणार आहे,” असे स्पष्ट मत विजय पांढरे यांनी व्यक्त केले…
पांढरे म्हणाले की, चितळे समितीने सिंचन घोटाळ्याबाबत सविस्तर आणि स्पष्ट अहवाल सरकारकडे सादर केला आहे. मात्र तो अहवाल आजपर्यंत जनतेसमोर आलेला नाही. सरकार या अहवालावर ना बोलते, ना कोणती ठोस कारवाई करताना दिसते. हा अहवाल जाणीवपूर्वक दाबला गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला…. राज्यातील सिंचन विभागाशी संबंधित अनेक मोठे घोटाळे सरकारकडे माहिती असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचं पांढरे यांनी नमूद केलं.
राज्यातील पाचही सिंचन मंडळांचे प्रमुख म्हणून अजितदादा पवार यांचं नाव सिंचन घोटाळ्यांशी जोडले गेले आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं…
पांढरे पुढे म्हणाले की,
कृष्णा खोरे प्रकल्पातील घोटाळ्याची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली होती, मात्र त्या चौकशीचा पुढे काहीच पाठपुरावा झाला नाही.
गोसीखुर्द प्रकल्पात प्रचंड आर्थिक घोटाळा झाला असून त्याबाबत समितीचा अहवाल सरकारकडे असूनही कारवाई नाही… कोल्हापूर येथील महालक्ष्मी कंपनीने केलेल्या मोठ्या सिंचन घोटाळ्याचा अहवालही सरकारकडे असून तो कुठे दाबला गेला, याचा उलगडा होत नाही….
आजच्या घडीला अधिकारी मनमानी पद्धतीने घोटाळ्याच्या फाईल्स ‘क्लीन’ करून शासन निर्णय (GR) काढत असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला…..बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाचं उदाहरण देत विजय पांढरे यांनी धक्कादायक आकडेवारी मांडली… ३० वर्षांपूर्वी अवघ्या ७ कोटी रुपयांचा प्रकल्प आज तब्बल ३५ हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे…मात्र या ३० वर्षांत प्रत्यक्ष काम केवळ ८ कोटी रुपयांचं झालं, त्यात ४ कोटी पुनर्वसनावर आणि ४ कोटी प्रत्यक्ष प्रकल्पावर खर्च झाले… “मग उरलेले ३५ हजार कोटी गेले कुठे?” असा थेट सवाल पांढरे यांनी उपस्थित केला… सिंचन विभागात १०० हून अधिक घोटाळे असल्याचा दावा करत राज्य सरकार या सर्व प्रकरणांकडे काना-डोळा करत असल्याचं हे कटू सत्य आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू दुर्दैवी असला तरी, सिंचन घोटाळ्यांची चौकशी, जबाबदारी आणि न्यायालयीन प्रक्रिया थांबवता येणार नाही, असा ठाम सूर विजय पांढरे यांनी लावला…

Related Articles

ताज्या बातम्या