3 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

मेहकरमध्ये ‘नायक’ स्टाईल!…* *नगराध्यक्ष किशोर गारोळेंची थेट मैदानात उतरून विकासाला गती…*

बुलढाणा ब्रेकिंग

*मेहकरमध्ये ‘नायक’ स्टाईल!…*

*नगराध्यक्ष किशोर गारोळेंची थेट मैदानात उतरून विकासाला गती…*


मेहकर शहरात सध्या एक वेगळीच चर्चा रंगली आहे. हिंदी चित्रपट नायकमधील अनिल कपूरप्रमाणे नगराध्यक्ष किशोर गारोळे थेट रस्त्यावर उतरून प्रत्यक्ष काम करताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या होम टाऊनमध्ये तब्बल 40 वर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या शहरात आता बदलाची चाहूल लागली आहे.


आजवर मेहकर शहराची ओळख विकास शून्य अशी होती. चांगले रस्ते नव्हते, सार्वजनिक ठिकाणी शौचालयांची कमतरता होती, पादचारी मार्ग, गार्डन, ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्याच्या जागा आणि मुलांसाठी खेळाची मैदाने — या मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित होते. मात्र नवनिर्वाचित नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी सत्तेत येताच लोकोपयोगी विकासकामांना तातडीने सुरुवात केली आहे.
शहरात आता 21 सार्वजनिक शौचालयांच्या उभारणीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून, शहरातील कोणत्याही वॉर्डमध्ये समस्या असल्यास नगराध्यक्ष स्वतः तेथे जाऊन त्या सोडवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अतिक्रमण असो, लोकेशनचा प्रश्न असो किंवा रखडलेली कामे — प्रत्येक ठिकाणी थेट हस्तक्षेप करत नगराध्यक्ष कामाचा सपाटा लावत आहेत.
कागदावर आदेश देणारे नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून विकास घडवणारे नगराध्यक्ष अशी ओळख तयार होत असून, मेहकर शहरात प्रथमच नागरिकांमध्ये चर्चा आहे —
नगराध्यक्ष नाही… तर ‘नायक’…

Related Articles

ताज्या बातम्या