2.2 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

संत तुकाराम महाराजांच्या तपश्चर्या भूमीवर उत्खननाचा घाला; …* *वारकरी संघटना आक्रमक — उत्खनन थांबवा अन्यथा मंत्रालय पोखरण्याचा इशारा…*

बुलढाणा

*संत तुकाराम महाराजांच्या तपश्चर्या भूमीवर उत्खननाचा घाला; …*

*वारकरी संघटना आक्रमक — उत्खनन थांबवा अन्यथा मंत्रालय पोखरण्याचा इशारा…*

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेली संत तुकाराम महाराजांची तपश्चर्या भूमी असलेल्या भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, घोराळा डोंगर व लेणी परिसरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात राज्यभरातील वारकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ही संपूर्ण जागा सन 2011 मध्ये राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली असतानाही काही भूमाफियांनी या पवित्र तपोभूमीवर सर्रास उत्खनन सुरू केल्याने संत तुकाराम महाराजांच्या वारशाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
या गंभीर प्रकाराच्या निषेधार्थ राज्यातील विविध वारकरी संघटनांनी एकत्र येत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तपोभूमीचे संरक्षण व संवर्धन व्हावे, तसेच तात्काळ अवैध उत्खनन थांबवावे, या मागणीसाठी राज्यभरासह बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर प्रशासनाला निवेदने सादर करण्यात आली आहेत…. अवैध उत्खनन त्वरित बंद न केल्यास येत्या 10 मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानावर ‘वारकरी गाथा आंदोलन’ छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच उत्खनन रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्यास थेट मंत्रालय पोखरून काढू, असा संतप्त इशारा वारकरी धर्म परिषदेचे अॅड. सतीशचंद्र रोठे यांनी दिला आहे.
संत तुकाराम महाराजांच्या तपश्चर्या भूमीवर सुरू असलेल्या या अवैध उत्खननामुळे केवळ ऐतिहासिक व धार्मिक वारशालाच नव्हे, तर वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेलाही तडा जात असल्याची भावना वारकऱ्यांतून व्यक्त होत आहे. आता प्रशासन या गंभीर प्रकरणाकडे कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे…

Related Articles

ताज्या बातम्या