2.2 C
New York
Wednesday, February 18, 2026

Buy now

spot_img

दिडशे क्विंटल ज्वारीच्या भाकऱ्या, 25 क्विंटल उडदाचे वरण !* *सुनगावच्या श्री आवजीसिद्ध महाराजांचा शेकडो वर्षांची परंपरा जपणारा आगळा-वेगळा भंडारा महाप्रसाद*

बुलढाणा

*दिडशे क्विंटल ज्वारीच्या भाकऱ्या, 25 क्विंटल उडदाचे वरण !*

*सुनगावच्या श्री आवजीसिद्ध महाराजांचा शेकडो वर्षांची परंपरा जपणारा आगळा-वेगळा भंडारा महाप्रसाद*

बुलढाणा जिल्ह्यातील जळगावजामोद तालुक्यातील सुनगाव येथे श्री आवजीसिद्ध महाराजांचा पारंपरिक व आगळा-वेगळा भंडारा महाप्रसाद भक्तिभावाच्या वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महाप्रसादाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 150 क्विंटल ज्वारीच्या भाकऱ्या आणि 25 क्विंटल उडदाच्या डाळीचे वरण तयार करण्यात आले.
या महाप्रसादासाठी पंचक्रोशीतील महिलांनी मोठ्या श्रद्धेने ज्वारीच्या भाकऱ्या तयार केल्या. भाकरी करण्याचे हे काम पूर्णपणे महिलांकडूनच पार पाडले जाते, तर उडदाच्या डाळीचे वरण मोठ्या हौदात तयार करण्यात येते.
या भंडाऱ्याची आणखी एक आगळी परंपरा म्हणजे संपूर्ण महाप्रसाद तयार होईपर्यंत कुणीही प्रसाद ग्रहण करत नाही. तसेच, महिलांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय पुरुष महाप्रसाद घेत नाहीत, ही शेकडो वर्षांपासून जपली जाणारी परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते…..
लोकवर्गणीतून हा महाप्रसाद आयोजित केला जात असून, येथे “महाप्रसाद कधीच कमी पडत नाही” अशी भाविकांची ठाम श्रद्धा आहे. यावर्षीही लाखो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
साधेपणा, समानता आणि भक्तीभाव यांचा संगम असलेला हा भंडारा महाप्रसाद सुनगावच्या श्री आवजीसिद्ध महाराजांच्या भक्तीपरंपरेचे जिवंत उदाहरण ठरत आहे…..

Related Articles

ताज्या बातम्या