2.4 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img

शिवजयंतीची बुलढाण्यात चाहूल;*…. *बुलढाण्यात ढोल-ताशांच्या गजरात ‘रुद्र ग्रुप’ची रंगीत तालीम..*

बुलढाणा फ्लॅश

*शिवजयंतीची बुलढाण्यात चाहूल;*….

*बुलढाण्यात ढोल-ताशांच्या गजरात ‘रुद्र ग्रुप’ची रंगीत तालीम..*

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पारंपरिक ढोल-ताशांच्या निनादाने सध्या वातावरण दणाणून गेले आहे. बुलढाणा येथील जिजामाता प्रेक्षागार मैदानावर ‘रुद्र ग्रुप’च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगीत तालमीला सुरुवात करण्यात आली आहे…शिवजयंती सोहळ्यात आकर्षक सादरीकरण करण्यासाठी ग्रुपमधील असंख्य तरुण-तरुणी उत्साहाने सहभागी होत असून दररोज नियोजनबद्ध सराव घेतला जात आहे. ताल-लय साधण्यासाठी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ढोल व ताशांच्या विविध ठेक्यांचा सराव करण्यात येत आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात मैदानावर रंगणाऱ्या तालमीमुळे परिसरात सणाचा माहोल निर्माण झाला आहे. या उपक्रमामुळे युवक-युवतींमध्ये शिवसंस्कृतीबद्दल अभिमान आणि एकात्मतेची भावना बळकट होत असल्याचे आयोजकांनी सांगितले… शिवजयंतीच्या निमित्ताने होणाऱ्या मिरवणुकीत बुलढाणेकरांसाठी आकर्षक व जोशपूर्ण सादरीकरण सादर करण्याचा ग्रुपचा मानस असून त्यासाठी सर्वजण मेहनत घेत आहेत… एकंदरीतच, ढोल-ताशांच्या दणदणाटात सुरू असलेली ही रंगीत तालीम शहरातील शिवजयंती उत्सवाची रंगत वाढवणारी ठरत आहे…

Related Articles

ताज्या बातम्या