2.2 C
New York
Tuesday, February 17, 2026

Buy now

spot_img

कवी लोकनाथ यशवंत यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन; बुलढाण्यात साहित्यप्रेमींची उत्सुकता

बुलढाणा फ्लॅश

*कवी लोकनाथ यशवंत यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन; बुलढाण्यात साहित्यप्रेमींची उत्सुकता..*

मराठी साहित्यातील प्रखर विद्रोही कवी म्हणून ओळख असलेले लोकनाथ यशवंत यांची नांदेड येथे होणाऱ्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम बुलढाणा येथे साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत पार पडणार आहे…या निवडीमुळे केवळ त्यांचा वैयक्तिक सन्मानच नव्हे तर वंचित, शोषित घटकांच्या आवाजाला मिळालेली दखल असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील विविध साहित्यिक व सांस्कृतिक संस्थांनी पुढाकार घेत सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी साहित्य अभ्यासक डॉ. गोविंद गायकवी राहणार असून सत्कार शुभहस्ते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक डॉ. सदानंद देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून विचारवंत डॉ. कि. वा. वाघ उपस्थित राहतील. प्रस्ताविक ज्येष्ठ साहित्यिक सुरेश साबळे करतील, सूत्रसंचालन नाट्यलेखक शरदकांत डांगळे करतील तर आभार प्रदर्शन कवी खिलेंद्र साबळे मांडतील.
हा कार्यक्रम प्रगती वाचनालय येथे बुधवार दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. विविध साहित्य संघटना व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमास साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या