8.3 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img

रोहित पवारांना मोठा धक्का, बारामती अ‍ॅग्रोची 161 एकर जमीन ईडीकडून जप्त

बारामती अॅग्रोने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त करण्यात आला आहे. बारामती अॅग्रो संबंधीत संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या कारवाईने रोहित पवार आणि शरद पवार गटाला मोठा धक्का दिला असल्याचं मानलं जात आहे.ईडीने मनी लॉंडरिंग प्रकरणी रोहित पवार यांच्याशी संबंधित बारामती अॅग्रो संबंधित छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड साखर कारखान्यातील 161.30 एकरची संपत्ती जप्त केली आहे.

त्यामध्ये जमीन, शुगर प्लान्ट, साखर कारखान्याची इमारत आणि अन्य गोष्टींचा समावेश आहे.

ईडीने शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. या कारखान्याची किंमत ही 50 कोटी 20 लाख इतकी आहे. या प्रकरणी 161 एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वात आधी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी राष्ट्रवादीचे अनेक नेते आरोपी बनवण्यात आले होते.

रोहित पवार यांचीसुद्धा जवळपास 3 दिवस चौकशी करण्यात आली होती. सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ईडीकडून कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करताना शिखर बँकेने जी प्रक्रिया राबवली होती, ती चुकीची असल्याचे ईडीने म्हटले होते. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे.

बारमती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. आमदार रोहित पवार यांच्याकडे बारमती अॅग्रो कंपनीची मालकी आहे. बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती.

Related Articles

ताज्या बातम्या