केदारनाथ : महाशिवरात्रीनिमित्ताने खास शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाशिवरात्री निमित्ताने शुक्रवारी केदारनाथ धामने महत्त्वाचे अपडेट दिले आहेत. केदारनाथाचं दर्शन 10 मेपासून घेता येणार आहे.
उत्तराखंडमधील बाबा केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात आज तारीख जाहीर करण्यात आली असून त्यानुसार 10 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून बाबा केदारचे दरवाजे उघडतील.
ओंकारेश्वर मंदिरातून ६ मे रोजी पालखी निघणार आहे. हा शुभ मुहूर्त बाबा केदारनाथ रावल यांच्यासह इतर पुजाऱ्यांच्या उपस्थितीत निश्चित करण्यात आला असून बाबा केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याची ही महत्त्वाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी बद्री केदार समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय हेही उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, पंचमुखी डोली 6 मे रोजी श्री केदारनाथ धामसाठी प्रस्थान करेल आणि विविध थांब्यांमधून 9 मे रोजी संध्याकाळी केदारनाथ धाम इथे पोहोचेल.