बुलढाणा
देशासह जिल्ह्यात लोकसभेचे वारे जोमात वाहायला लागले आहे.. इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे.. ज्याना लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे आहेत ते डोक्याला बाशिंग बांधून तयार आहेत… तर काहिनी पक्षाचे तिकीट मिळो किंवा ना मिळो जिल्ह्यात दौरे सुरु केले आहेत असे चित्र सध्या आहे…
गेल्या 30 वर्षापाडून लोकसभेची जागा ही शिवसेनेची कायम राहिली आहे… त्या अगोदर काँग्रेस कडे होती तेव्हा राखीव लोकसभा मतदार संघ होता… काँग्रेसचे बाळकृष्ण वासनिक त्यानंतर मुकुल वासनिक यांच्या नंतर शिवसेनेचे आनंदाराव अडसूळ यांनी जिल्ह्यावर् अधिराज्य गाजवलं.. जेव्हा राखीव मतदार संघ ओपन झाला तेव्हा मात्र शिवसेनेचे प्रतापरावं जाधव हे खासदार म्हणून निवडून आले ते 3 वेळेस कायम आज पर्यंत खासदार राहिले आहेत…सतत शिवसेनेचे वर्चस्व असलेला मतदार संघ आता अडचणीत सापडला असल्याचे चित्र दिसून येत आहे…
यावेळेस राष्ट्रवादी व शिवसेनेचे दोन गट झाले आहेत त्यात भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे… सात विधानसभा मतदार संघाचा जिल्हा आता लोकसभेच्या उमेदवारी साठी कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार राहील हे अद्याप अस्पष्ट आहे..
निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे मात्र उमेदवार व पक्ष घोषित न झाल्याने जिल्हावासी संभ्रमात आहेत..
जिल्ह्यात तीन आमदार भाजप, काँग्रेस एक, राष्टवादी एक व शिवसेनेचे दोन अस बलाबल् आहे… विद्यमान खासदार प्रतापरावं जाधव हे शिंदे गटाचे असून ते तीन वेळेस खासदार आहेत मात्र त्यांनी जिल्ह्यासाठी कुठलंही ठोस काम किंवा प्रकल्प अद्याप आणला नाही त्यामुळे जनता त्यांच्यावर उघड उघड नाराज असल्याचे बोलतंय.. तसेच त्यांना पर्याय पक्षात नसल्याने भाजपाने लोकसभेसाठी दावा केला आहे.. त्यामुळे प्रतापरावाच घोंगड अडकल्याचं दिसून येत आहे. तसेच उबाठा चा दमदार उमेदवार अद्याप समोर आला नाही.. ही जागा उबाठा ला महाविकास आघाडीतून घोषित झाली असली तरी तगडा उमेदवार त्यांच्याकडे नसल्याने महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षातील आयात उमेदवाराची शोधशोध सुरु असल्याचे दिसत आहे त्यासाठी अनेकजण तयार आहेत.. तर स्वतःला अपक्ष म्हणून घोषित केलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर व वन बुलढाणा मिशन चे संदीप शेळके हे सुद्धा उबाठा चे तिकीट मिळते काय या प्रयत्नात आहेत… अश्या गोंधळात महायुती व महाविकास आघाडी हे दोन्ही गट काय निर्णय घेतात याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे…