बुलडाणा
वरुड ग्रामपंचायंतीत् कायम सेवेत सलेल्या कर्मचाऱ्यास वेतन फरक व राहणीमान भत्ता पासून ठेवले जात आहे वंचित…
जिल्हा परिषद सिओ लक्ष देतील का, व त्या कर्मचाऱ्यास रखडलेली रक्कम मिळेल का?
बुलढाणा तालुक्यातील वरुड गावातिल ग्रामपंचायत मध्ये तीस वर्ष पाणी पुरवठा विभागात काम करणारे वयोवृद्ध कर्मचारी हरिभाऊ मघाडे हे राहणीमान भत्ता व वेतन फरक रकमेपासून वंचित असल्याची बाब उघडकीस आली आहे… वरुड गावाची लोकसंख्या 6 हजारा पर्यंत असून दररोज गावाला पाणी सोडण्याचे काम नित्यनियमाने करीत होते.. ग्रावणचायतिचे सर्व कामे त्यन्छ्तक्दुन् जरून घेतली जात होती आता ते सेवानिवृत्त झाले आहेत.. त्यांना अपंगतव आल्याने ते जमिनीला खिळून पडले आहेत.. ग्रामपंचायतीने अद्याप पर्यंत त्यांची देयकाची रक्कम न दिल्याने हरिभाऊ महादे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे… तरीही बुलढाणा पंचायत समिती व ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होताना दिसत असल्याचे स्पष्ट आहे…
गावातील वसुली होत नसल्याने तुमचे वेतन व राहणीमान भत्ता देऊ शकत नसल्याचे उत्तर ग्रामसेवक त्यांना देत आहेत्.. आता जिल्हा परिषद सिओ जिल्ह्यातील व त्यांच्या धाड सर्कल मधीलच असल्याने ते या प्रकरणात लक्ष घालतील का ? व हरिभाऊ मघाडे यांना त्यांच्या सेवानिवृत्ती नंतरची रक्कम देतिल् का असा प्रश्न चर्चिल्या जात आहे…