बुलढाणा
*आता…समाजवादी पार्टी सुद्धा बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात…*
महायुती व महाविकास आघाडी यांच्यातील लढत सरळ आहे मात्र या दोन्ही गटात जे पक्ष सामील झाले नाहीत ते पक्ष आपला उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीत उतरविण्याच्या तयारीत आहेत.. समाजवादी पार्टी महायुती सामील नाही तर तिकडे महाविकास आघाडी मध्ये सुद्धा या पक्षाचा समावेश नाही त्यामुळे बुलढाणा येथील समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष याकूब पठाण यांनी पत्रकार परिषद घेऊन आमच्या पार्टीचा सुद्धा बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केले आहे..
समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आसीम आझमी यांच्या आदेशाने पत्रकार परिषद घेतली असल्याचे जाहीर केले , तसेच ओबीसी, मुस्लिम, दलित एकत्रिक येऊन आम्ही समाजवादी पार्टीचा उमेदवार निवडून आणून अबू आसीम आझमी यांचे हात बळकट करणार असल्याचे पठाण यांनी सांगितले..
तसेच जिल्ह्यात समाजवादी पार्टीची स्थिति एकदम चांगली असल्याने समाजवादी पार्टी नक्की जिंकणार असा विश्वास याकूब पठान यांनी व्यक्त केलाय…