*बुलढाणा ब्रेकिंग*
*निवडणूक आयोगाकडे तक्रार केली म्हणून आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या अध्यक्षास जीवे मारण्याची धमकी.*
*सतीश रोठे यांनी IAS विशाल नरवाडेंची केली होती तक्रार.*बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल.*
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या नंतर ही बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेले IAS अधिकारी विशाल नरवाडे यांची सरकार ने नियुक्ती केली होती. निवडणूक काळात अशा अधिकाऱ्यांना स्वगृही नियुक्ती देता येत नाही असा नियम असताना ही नियुक्ती देण्यात आली म्हणून आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ऍड. सतीश रोठे यांनी या संबंधी मुख्य निवडणूक आयुक्तांना तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत दोनच दिवसात विशाल नरवाडे यांची धुळे येथे बदली करण्यात आली . विशाल नरवाडे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असल्याने त्यांच्या समर्थकांनी व नातेवाईकांनी ऍड सतीश रोठे यांच्या कार्यालयासमोर जाऊन त्यांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली यामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. एड रोठे यांनी यासंबंधी बुलढाणा पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी चार अनोळखी इसमां विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
तसेच या सर्व घटनेची तक्रार मुख्य निवडणूक आयोगाकडे ही करण्यात आली आहे , यावर निवडणूक आयोग पोलिसांना काय सूचना करतो हे बघणे महत्त्वाचं आहे.
——————————–