गेल्या 4,5 दिवसापासून मेहेकर सिंदखेडराजा तालुक्यातील काही भागात वादळी पाऊस कोसळत आहे, या वादळाने साखरखेर्डा परिसरातील अनेक गावातील व शेतातील विद्युत खांब उन्मळून पद्ले आहेत.. 6 दिवसापासून 10 ते 12 गावाचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे, ही सर्व गावे अंधारात असल्याचे समजते, विज वितरण कंपनी ने कामे युद्ध पातळीवर काम करणे गरजेचे होते मात्र अद्याप पर्यंत ही कामे न केल्याने परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी आ राजेंद्र शिंगणे यांच्या हि माहिती कळविली ताटडीने आ शिंगणे या परिसराची पाहणी केली व त्यांनी विज वितरण कंपनी च्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत कान उघडणी केली.. तात्काल विजेचे खांब उभे करा अन्यथा मला कारवाई करावी लागेल तसेच जिल्हा प्रशासनाला सुद्धा पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत..