बुलढाणा येथील अंशिक अनुप गव्हाळे या अवघ्या 21 महिन्याच्या बाळाने चांगलाच मोठा कारनामा केला आहे तो कारनामा म्हणजे त्याच नाव India Book of Records मध्ये नोंदवण्यात आलय. अफाट बुध्दी च्या आंशिक (लाडू) ने 18 पाळीव प्राण्यांची नावे, 18 जंगली प्राण्यांची नावे, 12 पक्ष्यांची नावे, 16 फळं, 12 भाज्यांची नाव, 10 वाहतुकीची साधने, 4 रंगांची नावे तसेच काही प्राणी आणि पक्ष्यांचे आवाजही काढून दाखवले आहे की नाही कमाल टॅलेंट ला वय नसत हे अगदी खरं आहे. यासाठी अंशिक चे अभिनंदन तर आहेच पण त्याला शिकवणारी त्याची पहिली गुरू त्याची आई सौ. शितल आणि त्याचे बाबा डॉ. अनुप रामेश्वर गव्हाळे यांनी अभिनंदन केले आहे .

