दारू सोडवण्यासाठी आलेल्या व्यक्तीला घाटनांद्रा येथील शिवाजी बर्डे उर्फ शिवा महाराजाकडून बेदम मारहाण करण्याचा व्हीडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला होता.. या प्रकरणी मार खाणारा व्यक्ती राजेश राठोड र जि. जालना याने रायपूर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्याने शिवाजी बरडे उर्फ शिवा महाराज रा. घाटनांद्रा, याच्या विरुद्ध काल मारहाण केल्याचा विविध कलमान्वये गुन्हा दाखल झालाय .. महाराजाचे हे प्रकरण गाजत असतांनाच आज पुन्हा एक नवीन व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हीडिओ मध्ये शिवा महाराज एका महिलेला मारहाण करतांना दिसत आहे… या व्हीडिओच्या संभाषणा वरून हे सिद्ध होते, की महाराज त्या महिलेच्या अंगातील भूतबाधा उतरवण्याचा प्रयत्न करीत आहे… त्यामुळे महाराजाकडून जादू टोना विरोधी कायद्याचा भंग झालाय .. मार खाणारी महिला कोण आहे, कुठली आहे? हे अद्याप तरी समोर आलेले नाही.. मात्र भूत उतरविण्याचा प्रकार महाराज करत असल्याचे त्यात दिसते आहे .. आता महाराजावर प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते?.. याकडे लक्ष लागून आहे. तर तथाकथित बुवाने एका मुलीच्या अंगातील भूत उतरवण्याच्या बाहण्याने तिला जी मारझोड केली, तिचे केस उपटले, हा महाराष्ट्र शासनाच्या जादूटोना विरोधी कायद्या अंतर्गत अनुसूची 1 नुसार गुन्हा आहे… अशा प्रकारे भूत उतरवण्याच्या बाहण्याने मारझोड करणे, तिचे केस उपटने, अघोरी उपचार करणे, हा गुन्हा असून महाराजावर तात्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा आणि बाबाला अटक व्हावी, अशी मागणी अखिल भारती अंधश्रद्धा निर्मूलन समितीनें केलोय..