आज दिनांक ३० जून २०२४ रोजी बुलढाणा शहरातील धाड नाका परिसरातील ओंकार लॉन्स येथे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसेच नागरिकांच्यावतीने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता,यावेळी भूमिपुत्र प्रतापरावजी जाधव साहेब यांचे बुलढाणा शहरातील त्रिशरण चौकातील प्रतापगड स्वागत कमानीपासून भव्य रॅली काढण्यात आली, यावेळी सदर रॅली बुलढाणा शहरातील मुख्य मार्गापासून कारंजा चौकामध्ये गेल्यानंतर भारत मातेचे पूजन करून त्या ठिकाणी त्यांना ५१ तोफाची सलामी देण्यात आली, पुढे रॅली मुख्य मार्केटमधून जयस्तंभ चौकामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांचे नेतृत्वामध्ये भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव साहेब यांचा मोठ्या क्रेनच्या सहाय्याने भव्यदिव्य असा पुष्पहार घालून तसेच दोन जेसीबी मधून पुष्पांचा वर्ष करून स्वागत करण्यात आले, यावेळी त्या ठिकाणी देखील धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्यासह शिवसेना युवासेना तसेच मित्रपक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…! धाड नाका परिसरातील ओंकार लॉन येथे भूमिपुत्र प्रतापरावजी जाधव साहेब यांचा सौ राजश्रीताई प्रतापराव जाधव यांच्यासह समस्त नागरिकांच्यावतीने तसेच शिवसैनिकांच्या वतीने भव्यदिव्य सत्कार करण्यात आला, यावेळी त्या ठिकाणी धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला, सदर कार्यक्रमासाठी नामदार प्रतापराव जाधव नागरी सत्कार समिती तथा समस्त बुलढाणेकरांचे मोठे सहकार्य लाभले ….!